Nana Patole | वंचित बहुजन आघाडीसोबतच्या युतीबाबत स्पष्टचं बोलले नाना पटोले; म्हणाले…

गोंदिया : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेना ठाकरे गट (Shivsena Thackeray Group) आणि वंचित बहुजन आघाडी (VBA) यांच्यात नुकतीच युती झाली. त्यावर बोलताना वंचित बहुजन आघाडीचा आणि महाविकास आघाडीचा काहीही संबंध नाही. अशी प्रतिक्रिया काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिली. युती ही शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात झाली आहे. त्यामुळे त्याचा महाविकास आघाडीशी काहीही संबंध नाही. तसा प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही. असं एका कार्यक्रमानिमित्त गोंदिया येथे आले असता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

या युतीमुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, ‘भाजप (BJP) आपले पाप लपविण्याकरिता हे सगळे करत आहे. पण या व्यतिरिक्त राज्यात इतर महत्वाचे प्रश्न नाहीत का? महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, शेतमालाला भाव मिळत नाही. पण या सर्व गंभीर विषयावरून जनतेचे लक्ष इतरत्र वळविण्याकरिता भाजपवाले महाविकास आघाडीत वंचितचा प्रवेश, असे मुद्दे समोर करीत असल्याचे यावेळी बोलताना नाना पटोले (Nana Patole) म्हणाले.

तसेच यावेळी बोलताना नाना पटोले यांनी पुण्यातील पोटनिवडणुकीवर (Pune Bypolls) देखील भाष्य केले.
नाना पटोले म्हणाले की, २ फेब्रुवारीला कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीवर महाविकास आघाडीच्या बैठकीत
कोण कुठली जागा लढविणार आहे हे ठरणार आहे. एक सर्वेक्षण समोर आले आहे.
त्यानुसार लोकसभेच्या ३८ जागा महाविकास आघाडी जिंकेल. असा दावा देखील यावेळी बोलताना नाना पटोले
यांनी केला. तर पुढे बोलताना ते म्हणाले की, राज्यपालांकडून शिंदे-फडणवीस यांना सरकार स्थापन करण्यासाठी
निमंत्रण नव्हते, हे आता माहिती अधिकारातून उघड झालं आहे.
तसेच हे सरकार असंवैधानिक असल्याचेही यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले.

Web Title :- Nana Patole | ambedkar thackeray alliance has nothing to do with maha vikas aghadi nana patole reacts

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chhagan Bhujbal | नाशिक पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचा विजय निश्चित – छगन भुजबळ

Bhagat Singh Koshyari | भगतसिंह कोश्यारी यांच्या राजीनाम्यानंतर कोण असू शकतात महाराष्ट्राचे संभाव्य राज्यपाल; समोर आली नावे

Pune Crime News | ‘तुला मॉडर्न मुलीसारखे राहता येत नाही, तू लो स्टँडर्ड आहेस’ असे म्हणत पत्नीचा छळ, जर्मनीत राहणाऱ्या पतीविरोधात पुण्यात FIR