गडकरींनी २०० कोटींचा मेंदू नागपूरच्या विकासासाठी वापरावा : नाना पटोले 

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – नागपुरात भाजपकडून नितीन गडकरी विरुद्ध काँग्रेसकडून नाना पटोले अशी लढत लोकसभेसाठी होत आहे. भाजपचे उमेदवार नितीन गडकरी त्यांच्यावर नाना पटोले यांनी सडकून टीका केली आहे. “गडकरी नेहमी दावा करतात की त्यांचा मेंदू २०० कोटींचा आहे. त्यामुळे त्यांनी नागपुरातच राहून त्यांचा २०० कोटींचा मेंदू नागपूरच्या विकासासाठी वापरावा. ते राज्यसभेवरच जाण्यासाठी ठीक आहेत. वाटल्यास आम्ही त्यांना राज्यसभेवर पाठवू ” असा टोला नाना पटोले यांनी लगावला आहे. पटोलेंनी आज नागपुरात बाईक रॅली काढली यावेळी ते बोलत होते.

त्यांची पार्सलं जनतेनं परत पाठवली
‘काँग्रेसने नागपुरात भंडाऱ्यावरून पार्सल आणलं आहे’ अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात बोलताना नाना पटोले यांना टोला लगावला होता आता त्याला पटोलेंनी उत्तर दिले आहे. ” भंडाऱ्याचा पार्सल मी नाही. भंडाऱ्याच्या पोटनिवडणुकीत गडकरी ,फडणवीस याची पार्सलं तिथल्या जनतेने परत  पाठवली. गडकरींचं  पार्सल पुढे इंदूरला जाईल. त्यामुळे पार्सल कोण हे आता जनताच ठरवेल. फडणवीस इथले महापौर होते. आज मुख्यमंत्री आहेत. जर तुम्ही विकास पुरुष असता, तर नागपूरची ६० टक्के जनता घाण पाणी पिण्यास मजबूर झाली नसती. मुख्यमंत्र्यांनी आधी आपली स्थिती पहावी,” अशा शब्दात पाटोले यांनी फडणवीसांना उत्तर दिलं.

गडकरींनी २०० कोटींचा मेंदू नागपूरच्या विकासासाठी वापरावा 

यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री आणि भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांच्यावर सडकून टीका केली यावेळी बोलताना पटोले म्हणाले, ” गडकरी नेहमी दावा करतात की त्यांचा मेंदू २०० कोटींचा आहे. त्यामुळे त्यांनी नागपुरातच राहून त्यांचा २०० कोटींचा मेंदू नागपूरच्या विकासासाठी वापरावा. ते राज्यसभेवरच जाण्यासाठी ठीक आहेत. वाटल्याकस आम्ही त्यांना राज्यसभेवर पाठवू “असे पटोले म्हणाले.
पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like