महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कार्यकारिणीत 2 मंत्र्यांसह विद्यमान कार्याध्यक्षांना डच्चू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  महाराष्ट्र काँग्रेसमध्ये खळबळ उडवून देणारे बदल हाय कमांडने केले आहेत. विद्यमान कार्यकारिणीतल्या अनेक मोठ्या नावांना आणि मंत्रिपदावरच्या नेत्यांना डावलून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. नाना पटोले यांचे नाव प्रदेशाध्यक्षपदी चर्चेत होतेच. त्याचप्रमाणे त्यांना राज्यातले मोठं पद देण्यात आलं आहे. नाना पटोले यांनी आगोदरच विधानसभेच्या सभापतीपदाचा राजीनामा दिल्याने त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद दिले जाणार हे जवळपास निश्चित झाले होते.

नाना पटोले यांच्या अध्यक्षपदाबरोबरच 6 नवे कार्यकारी अध्यक्ष पक्षाने राज्यात नेमले आहेत. तसेच 10 उपाध्यक्षपदाचे नवे चेहरे देण्यात आले आहेत. विद्यमान कार्यध्यक्ष यशोमती ठाकूर, विश्वजीत कदम यांना हाय कमांडने हटवलं आहे. त्यांच्या ऐवजी चंद्रकांत हांडोरे, प्रणिती शिंदे यांना संधी देण्यात आली आहे.

अशी आहे काँग्रेसची नवी प्रदेश कार्यकारिणी

प्रदेशाध्यक्ष – नाना पटोले

कार्यकारी अध्यक्ष

1. शिवाजीराव मोघे
2. बसवराज पाटील
3. मोहम्मद अरिफ नसीम खान
4. कुणाल रोहिदास पाटील
5. चंद्रकांत हांडोरे
6. प्रणिती सुशीलकुमार शिंदे

उपाध्यक्ष

1. शिरीष मधुकरराव चौधरी
2. रमेश बागवे
3. हुसेन दलवाई
4. मोहन जोशी
5. रणजित कांबळे
6. कैलास गोरंट्याल
7. बी.जी. नगराळे
8. शरद आहेर
9. एम.एम. शेख
10. माणिक जगताप