Nana Patole | ‘ते सत्तेत सोबत असूनही एकत्र नाहीत’ नाना पटोलेंचा टोला

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Nana Patole | नागपूर पदवीधर मतदार संघाचा धक्कदायक निकालानंतर आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते विधान परिषदेच्या नागपूर शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीकडे (Nagpur Teachers Constituency Election). ही जागा महाविकास आघाडीतील शिवसेनेला (Shivsena) सोडण्यात आली आहे. नागपूर शिक्षक मतदारसंघाची निवडणूक महाविकास आघाडी जिंकणार, असा विश्वास काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी व्यक्त केला आहे.

काँग्रेसमध्ये कुणाचीही आणि काशाचीही नाराजी नाही. काँग्रेसमध्ये गोंधळ सुरु आहे, असे जे विरोधक बोलत आहेत, तो कुठे आहे दाखवा, असे आव्हानच नाना पटोले यांनी दिले आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (BJP) शिंदे गटाला एकही जागा दिलेली नाही, हे अपेक्षितच होते. ते सत्तेत सोबत असूनही एकत्र नाहीत. पण महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) म्हणून आम्ही एक आहोत आणि पुढे जातोय, असे नाना पटोले (Nana Patole) म्हणाले.

दरम्यान, नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवर जाहीर करण्यासाठी मंगळवार पर्य़ंत
भाजप आणि काँग्रेसचे पहिले आप पहिले आप सुरु होते.
मात्र बुधवारी सकाळी भाजपकडून शिक्षक परिषदेचे उमेदवार म्हणून नागो गाणार (Nago Ganar) यांच्या
नावावर शिक्कामोर्तब केले. त्यांना तिसऱ्यांदा संधी मिळाली आहे.

Web Title :- Nana Patole | bjp did not give a single seat to shinde group nana patole

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjay Shirsat | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीवर बोलले शिंदे गटातील हे आमदार; म्हणाले…

Sourav Ganguly Statement | सचिन-विराटच्या तुलनेवरील वादावर गांगुलीचे मोठे वक्तव्य; म्हणाले…

State Excise Department | अवैध मद्य विक्री व अवैध मद्य सेवन करणाऱ्या विरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, पुण्यात 25 जणांना न्यायालयाने केला 37 हजारांचा दंड