Nana Patole | भाजपने शिवाजी महाराजांची बदनामी करणे हे जाणीपूर्वक रचलेले षडयंत्र – नाना पटोले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपच्या अनेक मंडळींनी म्हणजे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यापासून आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यापर्यंत अनेकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान होईल आणि शिवप्रेमींच्या भावना दुखावतील अशी वक्तव्ये केली आहेत. त्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपमध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याची चढाओढ लागली आहे, असे नाना पटोले (Nana Patole) म्हणाले आहेत.

 

मागील महिनाभरात भाजपच्या चार लोकांनी शिवाजी महाराजांचा अपमान होईल, अशी वक्तव्ये केली आहेत. हे सर्व अनवधानाने झालेले नसून, भाजपने शिवाजी महाराजांची बदनामी करण्याचे हे जाणीपूर्वक रचलेले षडयंत्र आहे, असे नाना पटोले म्हणाले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नितीन गडकरी यांचे गुणगाण गाण्याच्या नादात त्यांची तुलना शिवाजी महाराजांसोबत केली. त्यांनी शिवाजी महाराज आता जुन्या काळातील नायक आहेत, असे म्हणून महाराजांचा घोर अपमान केला आहे. त्यानंतर भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी शिवाजी महाराजांनी औरंगजेब बादशहाची पाच वेळा माफी मागितली, असे निर्लज्ज वक्तव्य केले. पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेची तुलना एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीशी केली आहे. त्यामुळे हे मोठे षडयंत्र असून समजून उमजून भाजपने केले आहे, असे नाना पटोले (Nana Patole) म्हणाले.

महापुरुषांचा अपमान करणे, त्यांची बदनामी करणे यात भारतीय जनता पक्षाला काहीच वाटत नाही.
राजरोसपणे अशी अपमानकारक वक्तव्ये होत असताना, या विधानांचा तीव्र शब्दांत निषेध करून कारवाई होणे अपेक्षित होते.
पण भाजपने तसे काहीही केलेले नाही. उलट ते सारवासारव करत आहेत.
भारतीय जनता पक्ष नितीमत्ता नसलेला पक्ष आहे. महाराजांची आणि महापुरुषांची बदनामी करण्याचे धाडस हे लोक सत्तेची गुर्मी चढल्याने करत आहेत.
पण, महाराष्ट्राची जनता हे कदापि सहन करणार नाही.
भाजपच्या या बेताल लोकांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय जनता शांत राहणार नाही, असा विश्वास यावेळी पटोलेंनी व्यक्त केला आहे .

 

Web Title :- Nana Patole | bjps planned conspiracy to insult chhatrapati shivaji maharaj so said nana patole

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Chandrashekhar Bawankule | ‘मागासवर्गीय समाजाला स्वतःचे हित कळतं…’; चंद्रकांत बावनकुळेंची प्रतिक्रिया

ShivendraRaje Bhosale | उदयनराजे भोसलेंच्या आंदोलनामागे कोण?; काही राजकीय स्वार्थ… – शिवेंद्रराजे भोसले

Kirit Somaiya | शिवाजी महाराजांबद्दल बोलताना काळजी घेतलीच पाहिजे – किरीट सोमय्या