Nana Patole | ज्यांना स्वतःचा पक्ष नाही त्यांनी काँग्रेसवर बोलणे हास्यास्पद, नाना पटोलेंचा एकनाथ शिंदेंना टोला

Nana Patole | congress nana patole criticized cm eknath shinde over dasara melava 2022
file photo

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Nana Patole | एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना स्वतःचा पक्ष कोणता हे माहित नाही, त्यांनी काँग्रेसवर (Congress) बोलणे हास्यास्पद आहे. काँग्रेस पक्ष देशातील सर्वात जुना, अनुभवी तसेच देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारा व देशाला जगात ताठ मानेने उभा करण्यात सिंहाचा वाटा असलेला पक्ष आहे. एकनाथ शिंदे यांची कामगिरी काहीही नाही. भाजपाच्या (BJP) इशार्‍यावर काम करणे व दिल्लीच्या आदेशाची अंमलबजावणी करणे एवढेच त्यांचे कर्तृत्व आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे. एकनाथ शिंदे यांनी काल दसरा मेळाव्याच्या (Dasra Melava 2022) भाषणात काँग्रेसवर टीका केली होती, या टीकेला पटोले यांनी उत्तर दिले.

 

एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल करताना नाना पटोले म्हणाले, मुंबईतील बीकेसी मैदानावरील (BKC Ground) एकनाथ शिंदे गटाच्या मेळाव्याला राज्यातील विविध भागातून सामान्य जनतेला खोटी माहिती देऊन भाडोत्री गर्दी जमवण्यात आली होती. परंतु या जनतेने शिंदेचे भाषण न ऐकताच काढता पाय घेतला. राज्याचा मुख्यमंत्री हा भारतीय जनता पक्षाच्या हातचे बाहुले असल्याचे राज्यातील जनतेने पाहिले. एकनाथ शिंदे यांनी आपल्या गद्दारीचे समर्थन करत भारतीय जनता पक्षाने लिहून दिलेल्या स्क्रिप्टचे वाचन केले.

 

नाना पटोले म्हणाले की, वास्तविक पाहता एकनाथ शिंदे यांची गद्दारी हा त्यांचा व शिवसेना (Shivsena) पक्षाचा अंतर्गत विषय आहे. परंतु आपल्या गद्दारीचे पाप झाकण्यासाठी एकनाथ शिंदे व त्यांचे समर्थक मंत्री, आमदार वारंवार काँग्रेसवर टीका करत आहेत ते आम्ही खपवून घेणार नाही. काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष कोण आहे किंवा असावा याची चिंता एकनाथ शिंदेंनी करु नये.

पटोले (Nana Patole) पुढे म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena chief Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने 2019 साली निवडून आणलेल्या आमदारांसह काँग्रेस, राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसच्या पाठिंब्याने महाविकास आघाडीचे सरकार (Maha Vikas Aghadi Government) स्थापन केले होते. जातीयवादी शक्तींना सत्तेपासून दूर ठेवून राज्यातील जनतेच्या हितासाठी हे सरकार स्थापन केले होते. एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्याबरोबरचे 40 आमदारही या सरकारमध्ये होते. काँग्रेसचा पाठिंबा एवढा नकोसा होता तर त्याचवेळी बाहेर पडण्याचे धाडस का केले नाही?

 

पटोले म्हणाले, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या विचारांचा वारसा सांगता
पण याच बाळासाहेब ठाकरे यांनी राष्ट्रपतीपदासाठी काँग्रेस उमेदवार प्रतिभाताई पाटील (Pratibhatai Patil)
व प्रणव मुखर्जी (Pranab Mukherjee) यांना पाठिंबा दिला होता हे एकनाथ शिंदे यांना माहित नाही का?
त्यावेळीही विरोध करण्याचे धाडस एकनाथ शिंदे यांनी केले होते का? स्वतःची राजकीय महत्वाकांक्षा व
भाजपाच्या सल्ल्यावर मान डोलावणार्‍या एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसला दोष देणे थांबवावे.

 

Web Title :- Nana Patole | congress nana patole criticized cm eknath shinde over dasara melava 2022

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Registration and Stamp Duty Dept | तुकड्यातील जमिनींच्या दस्त नोंदणीबाबतचा अहवाल महसूल सचिवांकडे सादर

Arranged Marriage | अ‍ॅरेंज मॅरेजसाठी होकार देण्यापूर्वी आवश्य विचारा ‘या’ 3 गोष्टी, अन्यथा करावा लागेल पश्चाताप

Heartburn | छातीत जळजळ किंवा Heartburn का होते, जाणून घ्या याची लक्षणे आणि बचावाचे उपाय

Total
0
Shares
Related Posts
Satish Wagh Murder Case | Satish Wagh was killed by paying a supari of 5 lakhs; Out of the five accused, 3 accused were detained by the police; Neighbor committed act due to personal dispute (Video)

Satish Wagh Murder Case | सतीश वाघ यांची हत्या 5 लाखांची सुपारी देऊन; पाच आरोपींपैकी 3 आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात; शेजारी राहणार्‍याने वैयक्तिक वादातून केले कृत्य (Video)