Nana Patole | हा पालकमंत्री काय स्पायडरमॅन आहे का?, उपमुख्यमंत्री फडणवीस यांना नाना पटोले यांचा टोला, म्हणाले – राज्यातील ईडी सरकार…

मुंबई : Nana Patole | एक दोन नव्हे तर राज्यातील तब्बल 6 जिल्ह्यांच्या पालकमंत्री (Guardian Minister) पदाची जबाबदारी घेतलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर विरोधकांकडून सातत्याने टीका केली जात आहे. आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (Congress) कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनीही अप्रत्यक्षपणे फडणवीसांवर टीका केली आहे. हा पालकमंत्री काय स्पायडरमॅन (Spiderman) आहे का? असा टोला त्यांनी लगावला आहे.

नाना पटोले म्हणाले, शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde-Fadnavis Government) तीन महिन्यानंतर पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. सर्वात गंभीर बाब म्हणजे सहा जिल्ह्याला एकच पालकमंत्री दिला आहे. हा पालकमंत्री काय स्पायडरमॅन आहे का? सहा जिल्ह्याच्या विकास कामांसाठी ते वेळ कसा देणार? या दोघांच्या वादात जिल्ह्यातील विकासकामांचा बोजवारा उडाला आहे.

भाजपावर (BJP) टीका करताना पटोले (Nana Patole) म्हणाले, शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री स्वतःच मोदी-शाह यांचे हस्तक असल्याचे जाहीरपणे सांगतात. महाराष्ट्रातील उद्योगधंदे व गुंतवणूक गुजरातमध्ये पाठवली जात आहे. आता तर महाराष्ट्राचे दोन मंत्री गुजरातमध्ये जाऊन आले. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये कसे पाठवायचे याचा अभ्यास करायला ते गेले होते काय?

पटोले म्हणाले, राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार हे दिल्लीच्या इशार्‍यावर काम करत आहे, दिल्लीला विचारल्याशिवाय ते कोणताच निर्णय घेऊ शकत नाहीत. त्यामुळे सारख्या दिल्ली वार्‍या कराव्या लागतात हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.

पटोले (Nana Patole) पुढे म्हणाले की, राज्यातील ईडी (ED) सरकार असंवैधानिक आहे हे आम्ही सुरुवातीपासूनच सांगत आहोत. दुसरीकडे महागाईने जनता त्रस्त आहे. मध्यमवर्गही महागाईने पिचला आहे पण केंद्र सरकार (Central Government) आपली जबाबदारी झटकत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण (Union Finance Minister Nirmala Sitharaman) या महागाई राज्य सरकारने (State Government) कमी करावी असे म्हणत आहेत. महाराष्ट्रातील (Maharashtra) सध्याचे सरकार दिल्लीच्या इशार्‍यावर काम करत आहे, त्यामुळे निर्मला सितारमण यांनी सांगितल्याप्रमाणे महागाई कमी करण्यासाठी ते काय करतात ते पहावे लागेल.

राज्यातील शेतकर्‍यांच्या स्थितीवरून टीका करताना नाना पटोले म्हणाले, आधीच या सरकारने मंजूर विकासकामांना स्थगिती दिली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यातील रस्ते अत्यंत खराब आहेत. अतिवृष्टीने शेतकर्‍यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले, सोयाबिन गेले, भाजीपाला, फळबागा, सर्व काही वाया गेले आहे. त्याचे पंचनामे व्यवस्थित केलेले नाहीत.

अमरावती (Amravati), अकोला (Akola) यासह राज्याच्या अनेक जिल्ह्यातील परिस्थिती मी पाहिली,
पण सरकारची उदासिनता दिसून येते. शेतकर्‍यांना अजून मदत मिळालेली नाही.
राज्यातील ईडी सरकार शेतकरी (Farmer) विरोधी आहे हे त्यांच्या कृतीतून दिसत आहे.

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडे यात्रेबाबत नाना पटोले म्हणाले,
राहुल गांधी यांचा साधेपणा व नम्रपणा लोकांना भावतो आहे, त्यामुळेच ‘भारत जोडो’ यात्रेत लोकांचा पाठिंबा वाढत आहे.
पण काही विकृत मनोवृत्तीचे लोक पदयात्रेला व काँग्रेस पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत.
त्यात त्यांना यश येणार नाही.

जे लोक यात्रेमुळे घाबरलेले आहेत ते जाणीवपूर्वक काँग्रेस पक्षाविषयी व पक्षातील काही नेत्यांबद्दल अफवा पसरवत आहेत.
महाराष्ट्र ही पदयात्रा सर्वात मोठी व्हावी यासाठी मोठ्या संख्येने सहभाग घेतला जाणार आहे.

Web Title :- Nana Patole | congress nana patole on appointment of guardian minister devendra fadnavis maharashtra government

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pankaja Munde | ‘…तर मोदीही मला संपवू शकत नाही’, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर विधानसभेचा दाखला देत बंधू धनंजय मुंडे म्हणाले…

Maharashtra Politics Crisis | तारीख निश्चित, महाराष्ट्रातील शिंदे-ठाकरे वादावर ‘या’ तारखेला होणार सुनावणी

CM Eknath Shinde | ‘अनाथांचे नाथ एकनाथ, तुम्ही दयाळू आहात’, पोलीस निरीक्षकाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे केली ‘ही’ मागणी