Nana Patole | काँग्रेस महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार, राहुल गांधीसोबत झालेल्या बैठकीत निर्णय; नाना पटोलेंची माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  राज्यातील सर्व महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (municipal elections) स्वबळावरच लढवण्याची घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे. नाना पटोले (Nana Patole) यांनी दिल्लीत राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भेट घेतली. स्वबळार निवडणूक लढण्यासाठी काँग्रेस नेते (Congress leader) राहुल गांधी यांनी हिरवा कंदिल दाखवल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली आहे. कर्नाटकचे काँग्रेस प्रभारी एच.के. पाटील (H.K. Patil) यांच्यासमवेत नाना पटोले यांनी मंगळवारी राहुल गांधी यांची भेट घेऊन पक्षाच्या रणनीतीबाबत चर्चा केली होती.

आघाडी सरकारमध्ये (MVA) एकत्र असूनही काँग्रेस महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक स्वबळावर लढवणार आहे.
यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राज्यातील पक्षाच्या भवितव्यासाठी ‘मास्टर प्लॅन’ प्रस्तावित केला असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज दिली.

राहुल गांधीसोबतच्या बैठकीत निर्णय

नाना पटोले म्हणाले, महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढेल हा निर्णय राहुल गांधी यांच्या सोबत झालेल्या बैठकीत झाला आहे.
पक्षश्रेष्ठींचा हा निर्णय आहे तो सर्वांना पाळावा लागेल.
तसेच कुठल्याही मंत्र्याच्या चुकीचा अहवाल काँग्रेस वरिष्ठांना गेला नसल्याचे पटोले यांनी सांगितले.

फोन टॅपिंगची चौकशी झाली पाहिजे

प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी फोन टॅपिंगवर (Phone tapping) भाष्य केलं.
महाराष्ट्रात 2017-18 मध्ये फोन टॅपिंग झाले होते.
जी काही माहिती असते ती सरकारलाच भेटत असते. मध्य प्रदेश आणि कर्नाटक निवडणुकीच्या वेळी याचाच वापर करण्यात आला. हे संविधानाच्या विरोधात आहे.
गोपनीयतेचा भंग असून सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडून याची चौकशी झाली पाहिजे असेही पटोले म्हणाले.

राज्यपालांच्या निवासस्थानासमोर आंदोलन

फोन टॅपिंग प्रकरणावर बोलताना पटोले म्हणाले, आम्ही राज्यपाल यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करणार आहे. यानंतर राज्यपालांना निवेदन देणार आहोत.
राष्ट्रपतींनी या प्रकरणात हस्तक्षेप करावा अशी मागणी आम्ही राज्यपलांकडे करणार असल्याची माहिती पटोले यांनी यावेळी दिली.

यावर पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील

काँग्रेस आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका मित्रपक्ष असलेल्या शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) सोबत लढवणार का ? या प्रश्नावर बोलताना पटोले म्हणाले, निवडणूक तीन वर्षानंतर आहे.
यावर पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. महाविकास आघाडी सरकारच्या पक्षांमध्ये सुरु असलेल्या संघर्षादरम्यान हे विधान आले आहे.
यापूर्वी पटोले यांनी माझे फोन महारष्ट्र सरकार टॅप करत असून काही लोक काँग्रेसच्या पाठीत वार करत असल्याचा गंभीर आरोप केला होता.

Web Title : nana patole | congress will contest municipal elections on its own decision in the meeting with rahul gandhi nana patole

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Dearness Allowance | खुशखबर ! केंद्र सरकारने ‘या’ कर्मचार्‍यांचा वाढवला महागाई भत्ता, मंत्रालय वेगळा आदेश जारी करणार

Rape Case | 3 लग्न झालेल्या पोलिस कर्मचार्‍याकडून स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

Maharashtra Unlock | महाराष्ट्र ‘Unlock’ करण्याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं महत्वाचं विधान; म्हणाले…