Nana Patole Criticize Raj Thackeray | ‘त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे’; नाना पटोलेंनी नाव न घेता केली राज ठाकरेंवर कारवाईची मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Nana Patole Criticize Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी मशिदीच्या भोंग्याबाबत आक्रमक पवित्रा घेतला आहे.
राज ठाकरे यांनी राज्य सरकारला 3 मेपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. मशिदींवरील भोंग्यांविरोधात (Loudspeaker On Mosque)
हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) पठण करण्याची भूमिका राज ठाकरे यांनी घेतली आहे.
याच पार्श्वभूमीवर बोलताना काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)
यांनी राज ठाकरे यांचं नाव न घेता त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. (Nana Patole Criticize Raj Thackeray)

 

हिंदू – मुस्लिम (Hindu – Muslim) हा वाद महागाईवरून लक्ष विचलित करण्यासाठी केलेला प्रयत्न आहे.
आमची राज्य सरकारला विनंती आहे की, धार्मिक तेढ (Religious Rift) करणाऱ्या लोकांना सभा घ्यायला बंधन घातली पाहिजेत आणि त्यांच्यावर तात्काळ कारवाई करायला हवी.
राज्यातील एकात्मता आणि भाईचारा संपवण्याचा जो कोणी प्रयत्न करत असेल त्याला शासन हे झालं पाहिजे ही मागणी काँग्रेसच्यावतीने (Congress) करत असल्याचं नाना पटोले यांनी सांगितलं.

मी स्वत: हिंदू आहे, मी स्वत: दररोज हनुमान चालिसा वाचतो, पण मी त्याचा बाऊ करत नाही.
महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत मात्र धार्मिक तेढ करून केंद्र सरकारचं (Central Government)
अपयश हे लपवलं जात असल्याचं नाना पटोले म्हणाले.
त्यासोबतच उत्तर कोल्हापूरमध्ये पार पडलेल्या पोटनिवडणुकीवरून (By – Election In Maharashtra )
नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला.

 

दरम्यान, देशामध्ये ज्या ठिकाणी पोटनिवडणुक (By – Election) झाल्या त्यामध्ये जनतेने भाजपचा सुफडा साप केला आहे.
महाराष्ट्रातील कोल्हापूरमध्येही (Kolhapur Nother By – Election) ती परिस्थिती पाहायला मिळाली असून जनता आता सतर्क झाल्याचं म्हणत पटोलेंनी भाजपवर (BJP) टीका केली.

 

Web Title :- Nana Patole Criticize Raj Thackeray | Congress leader nana patole criticize mns chief raj thackeray over hanuman chalisa against masjid loudspeaker

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा