×
Homeताज्या बातम्याNana Patole | हे दळभद्री सरकार, यांच्या नाकर्तेपणामुळे शेतकर्‍यांची दिवाळी अंधारात, नाना...

Nana Patole | हे दळभद्री सरकार, यांच्या नाकर्तेपणामुळे शेतकर्‍यांची दिवाळी अंधारात, नाना पटोले यांचा घणाघात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात शेतकर्‍यांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. परंतु अद्याप सर्व शेतकर्‍यांना मदतीचा हात पोहचलेला नाही. यामुळे शेतकर्‍यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीने (NCP) शेतकर्‍यांचा हा मुद्दा लावून धरला आहे. अजित पवार (Ajit Pawar), जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी शेतकर्‍यांच्या प्रश्नावर शिंदे-फडणवीस सरकारला कठोर शब्दात फटकारले आहे. तसेच राज्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नाना पटोले (Nana Patole) यांनी दिला आहे.

 

नाना पटोले (Nana Patole) म्हणाले, राज्यातील शेतकर्‍यांची अवस्था यंदा अत्यंत बिकट झाली आहे. अतिवृष्टीने शेतमालाचे प्रचंड नुकसान केले. विदर्भ, मराठवाड्यातील शेतकरी तर नैसर्गिक संकटामुळे हतबल झाला आहे. शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde-Fadnavis Government) जाहीर केलेल्या मदतीचा छदामही अजून मिळालेला नाही, पंचनामे करण्यातही प्रशासन ढिम्म आहे. आता परतीच्या पावसानेही शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. राज्य सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा. अन्यथा काँग्रेस पक्ष तीव्र आंदोलन करेल.

 

नाना पटोले म्हणाले, यावर्षी शेतकर्‍यावर निसर्गाने अवकृपा केली. राज्यातील विदर्भ, मराठवाड्यासह काही भागात अतिवृष्टी झाली, त्यात शेतातील उभे पीक वाया गेले. सोयाबीन, कपाशी, तुर, मका, बाजारी पिक हातातून गेले. फळबागा व पालेभाज्यांनाही या पावसाचा फटका बसला, पशुधनाचेही नुकसान झाले.

पटोले म्हणाले, राज्य सरकारने मंत्रालयात बसून पंचनामे करण्याचे आदेश दिले पण स्थानिक पातळीवर प्रशासन कामच करत नसल्याचे चित्र आहे. मी स्वतः विदर्भ व मराठवाड्यातील अतवृष्टीग्रस्त भागाला भेट देऊन शेतकर्‍यांशी संवाद साधला. अधिकारी पंचनामे करण्यास येतच नाहीत, जे काही पंचानामे होत आहेत ते वस्तुस्थिती पाहून केले जात नाहीत यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होत आहे. राज्य सरकारने (State Government) जास्त मदत दिल्याची घोषणा केली पण ही मदतही तुटपुंजीच आहे आणि तीसुद्धा अद्याप शेतकर्‍यांना मिळालेली नाही.

 

पटोले पुढे म्हणाले की, अतिवृष्टीनंतर शेतकर्‍यांचे झालेले नुकसान पाहता
राज्य सरकारने तातडीने हालचाली करून मदतीचा हात देणे गरजेचे होते पण तसे झाले नाही.
महाविकास आघाडी सरकारने (Maha Vikas Aghadi Government) नैसर्गिक आपत्ती ओढवताच तात्काळ
दहा हजार रुपयांची रोख मदत दिली व नंतर 10 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते.

 

ते पुढे म्हणाले, मविआचे सरकार येताच पहिला निर्णय शेतकर्‍यांचे कर्जमाफीचा घेऊन खात्यात थेट पैसे जमा केले.
अटी, शर्थी, नियमांचे अडथळे निर्माण करुन शेतकर्‍याला ऑनलाईनच्या रांगेत दिवसरात्र उभे केले नाही.
शेतकरी हा सरकारचा प्राधान्यक्रम असला पाहिजे पण भाजपा सरकार (BJP Government)
हे शेतकरीविरोधी असल्याने मदतीसाठी हात आखडताच घेतला जात आहे.

नाना पटोले म्हणाले, काँग्रेस पक्षाने याधीच ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती.
पण राज्यातील ईडी सरकारने (ED Government) शेतकर्‍यांकडे साफ दुर्लक्ष केले.
आताही परतीच्या पावसाने शेतकर्‍यांची यंदाची उरली सुरली स्वप्नेही धुळीस मिळवली आहेत पण सरकारला त्यांच्यातील भांडणातूनच वेळ मिळत नाही.
काँग्रेस पक्ष शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून सरकारने लवकारत लवकर ओला दुष्काळ जाहीर करून
मदत केली नाही, तर मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही.

 

 

Web Title :- Nana Patole | due to the failure of the dalbhadri government in the state farmers diwali is in the dark says nana patol

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Women Asia Cup 2022 | आशिया कप फायनलमध्ये श्रीलंकेचा धुव्वा उडवत टीम इंडियाने केला ‘हा’ पराक्रम

Nilesh Rane | निलेश राणेंची जीभ पुन्हा घसरली, भास्कर जाधवांना म्हणाले बिनकामाचा बैल, जयंत पाटील, अजित पवारांवर केली टीका

Chitra Wagh | कोणी जर मुली बाळींकडे वाकड्या नजरेने पाहण्याचा प्रयत्न केला, तर…, चित्रा वाघ यांचा इशारा

Must Read
Related News