Nana Patole | ‘भाजपला हे महागात पडेल’; पाटणकरांवरील कारवाईनंतर नानांचा भाजपला इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Nana Patole | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांच्यावर ईडीने (ED) कारवाई केली आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली असून आता राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपला इशारा दिला आहे.

 

केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असून यंत्रणा त्रास देत आहेत परंतू महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi Government) सरकारला धोका नाही. मात्र भाजपला (BJP) हे महागात पडणार असल्याचं म्हणत नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपवर टीका केली आहे. या कारवाईनंतर सरकारमधील नेत्यांनी भाजपवर टीकेचे बाण सोडले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचं म्हटलं आहे.

 

ईडीचा (ED) गैरवापर वाढत आहे, राजकीय हेतूने त्रास देण्यासाठी ही कारवाई झाली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा भाजपकडून गैरवापर होत असल्याचं शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटलं आहे. याआधी ईडी नावाची संस्था कोणालाच माहित नव्हती मात्र आता संस्था गावागावात पोहोचली असल्याचं पवार (Sharad Pawar) म्हणाले.

 

दरम्यान, श्रीधर पाटणकर यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी,
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा (Resignation) द्यावा अशी मागणी केली आहे.
आता पुढे काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

 

Web Title :- Nana Patole | ed action nana patoles direct warning to bjp

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ajit Pawar | आधी अंडरस्टॅन्डींग, मग जुगलबंदी ! दोन नेत्यांच्या शाब्दिक संघर्षात अजित पवार म्हणाले…

 

Madhuri Dixit Gorgeous Look | वयाच्या 50 व्या वर्षी सुद्धा माधुरी दिक्षित दिसते इतकी सुंदर, पाहा व्हायरल फोटो

 

Eknath Khadse | ‘1993 ला बाळासाहेब ठाकरे होते म्हणून मुंबईतील हिंदू सुरक्षित राहिला’ – राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे

 

Mouni Roy Superhot Look | पांढऱ्या रंगाच्या बॅकलेस ड्रेसमध्ये आरशा समोर स्वत:ला पाहत राहिली मौनी रॉय, पाहा व्हायरल फोटो