Nana Patole | ‘सतीश उकेंकडील महत्त्वाच्या फाईल्स जप्त करण्यासाठीच ED ने धाड टाकली – नाना पटोले

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Nana Patole | ईडीने (ED) वकील सतिश उके (Lawyer Satish Uke) यांच्यावर कारवाई केल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी गंभीर आरोप केले आहेत. सतीश उके यांच्याकडे न्या. लोया मृत्यूप्रकरण (Justice Loya Death Case), निमगडे प्रकरण (Nimgade Case) आणि इतर महत्वाच्या प्रकरणांच्या फाईल्स होत्या. या फाईल्स ताब्यात घेण्यासाठीच ‘ईडी’कडून सतीश उके यांच्या घरावर छापा टाकला असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

 

माध्यमांशी बोलताना नाना पटोले (Nana Patole) म्हणाले की, ”ही धाड मुंबईतील (Mumbai) ईडीच्या अधिकाऱ्यांकडून टाकण्यात आली आहे. नागपूरमध्येही (Nagpur) ईडीचे कार्यालय आहे. मात्र, त्यांना या सर्वांचा पत्ताही नव्हता. ईडीच्या अधिकाऱ्यांनी सतीश उके यांच्याकडील फाईल्स आणि त्यांचा मोबाईल जप्त केला. या फाईल्समध्ये अनेक महत्त्वाच्या प्रकरणांची माहिती आहे. मात्र, ईडीचा गैरवापर करून या फाईल्स जप्त केल्या आहेत. असं पटोले यांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर टीकास्च्र सोडलं आहे.

 

उच्च न्यायालय (High Court) आणि सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court)
मुख्य न्यायाधीशांनी या प्रकरणात स्यू मोटो याचिका (Sue Moto Petition) दाखल करून हस्तक्षेप करावा, अशी मागणी नाना पटोले यांनी केली.
तर, ईडीचा कायदा हा ड्रग माफिया आणि दहशतवादाला चाप लावण्यासाठी तयार केला होता. पण या कायद्याचा गैरवापर केला जातोय.
एका वकिलाच्या फाईल्स जप्त करण्यासाठी ईडीचा वापर होत आहे. सतीश उके यांच्या घरी मुंबईतील ईडी अधिकारी फौजफाटा घेऊन पोहोचले होते.
नागपूरमधील ईडी कार्यालयाला याची माहितीही नव्हती. या सगळ्या दबावतंत्राचा वापर कशासाठी केला जातोय? असा प्रश्न देखील पटोले यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, नाना पटोले पुढे म्हणाले, ”न्यायमूर्ती लोया मृत्यूप्रकरण आणि निमगडे प्रकरणात सतीश उके यांची भूमिका महत्त्वाची आहे.
त्यामुळेच सतीश उके यांचे तोंड बंद करण्यासाठी त्यांच्याकडील फाईल्स जप्त करण्यात आल्या.
ईडीच्या कायद्यात कोणावर कारवाई करावी, हे नमूद करण्यात आले आहे. मात्र, हे नियम डावलून ईडीचा गैरवापर सुरु आहे.
त्यामुळे आता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आणि देशाच्या सरन्यायाधीशांनी यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे.
भाजपच्या हिटलशाहीपासून देशातील लोकशाही वाचली पाहिजे.”

 

Web Title :- Nana Patole | ed misused to seized justic loya case and other files from satish ukey cji should intervene says nana patole

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Miss Universe Harnaaz Kaur Sandhu | वाढलेल्या वजनामुळं सौंदर्यवती Miss Universe हरनाझ कौर संधू ट्रोल..

 

Pune Municipal Corporation (PMC) | अधिकृत मंडई व्यतिरिक्त सार्वजनिक रस्त्यावर बसून व्यवसाय करणाऱ्यांकडून महापालिका आकारणार प्रतिदिन 50 रुपये

 

PMC Health Department | पुणे महापालिकेच्या आरोग्य सुविधा व योजना सर्वसामान्य घटकांपर्यंत पोहोचवण्यात नगरसेवकांचाही महत्वाचा वाटा – सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. अंजली साबणे