Nana Patole | माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला, मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यावर केलेल्या आरोपांवर पटोलेंचे स्पष्टीकरण (video)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी लोणावळ्यात पार पडलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आपल्यावर पाळत ठेवून आहेत, असा गंभीर आरोप नाना पटोले (Nana Patole) यांनी केला होता. तसेच स्वबळाची भाषा केल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागली आहे, असेही पटोले म्हणाले होते. याचदरम्यान नाना पटोले यांनी एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना यावर स्पष्टीकरण दिले आहे.

माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला

नाना पटोले म्हणाले, तुम्हाला मिळालेल्या क्लिपचा अर्थ तसा नाही, माझ आरोप राज्य सरकारवर (State Government) नव्हे तर केंद्र सरकारवर (Central Government) होते. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे. मी हे बोललो खरं आहे की, पक्ष वाढीसाठी मी स्वबळाचा नारा दिला होता. मी बोललो तर चूक आणि इतरांनी हे वक्तव्य केलं तर ते योग्य ? हे माझं वक्तव्य आहे, असे नाना पटोले म्हणाले.

सरकारवर कोणताही आरोप नाही

पाळत ठेवण्याच्या वक्तव्यावर बोलताना नाना पटोले म्हणाले, पाळत ठेवण्याबाबत माझा सरकारवर कोणताही आरोप नाही. असं स्पष्टीकरण नाना पटोले यांनी दिले आहे. आयबीच्या मदतीनं आपल्या हालचालींवर नजर ठेवली जात असल्याचा दावा पटोले यांनी लोणावळ्यातील कार्यकर्ता मेळाव्यात केला होता. त्यांच्या या वक्तव्यामुळे आघाडीत बिघाडी झाल्याची चर्चा सुरु झाली होती. मात्र आता यावर खुद्द नाना पटोलेंनी स्पष्टीकरण दिले आहे.

काय म्हणाले होते नाना पटोले ?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्यावर पाळत ठेवून आहेत, असा खळबळजनक आरोप नाना पटोले यांनी केला होता. नाना पटोले यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर आरोप केल्याने आघाडीमध्ये वाद आणि बेबनाव निर्माण होण्याची शक्यता आहे. आपण स्वबळाची भाषा केल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागली आहे, असं नाना पटोले म्हणाले होते.

Web Title : nana patole explanation on the allegations made against the cm uddhav thackeray and deputy cm ajit pawar

 

हे देखील वाचा

Pune Crime Branch Police | वाहन चोरी प्रकरणातील संशयित दाम्पत्यानं गुन्हे शाखेच्या कर्मचार्‍याच्या हाताचा घेतला चावा

Retirement च्या नंतरसुद्धा EPF खात्यावर मिळू शकते व्याज ! ते सुद्धा विना कॉन्ट्रीब्यूशन,
जाणून घ्या कधी आणि कसे?

Pune Crime News | कुख्यात तडीपार गुंड पप्पू वाडेकरचा खून, पुणे जिल्ह्यात खळबळ

Pritam Munde | प्रीतम मुंडेंना डावलल्याचा भाजपला मोठा फटका, बीडमध्ये 2 दिवसांत 74 पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे