Nana Patole | नाना पटोलेंचं आक्षेपार्ह विधान; म्हणाले – ‘मी मोदीला मारू शकतो आणि शिव्याही देऊ शकतो’

भंडारा : पोलीसनामा ऑनलाइन – Nana Patole | काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचं एक आक्षेपार्ह विधान समोर आलं आहे. ‘मी मोदीला (PM Narendra Modi) मारू शकतो व शिव्याही देऊ शकतो आणि म्हणून मोदी माझ्या विरोधात प्रचाराला आला’ असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं आहे. पटोले यांचा हाच व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच प्रसारित झाला आहे. या व्हिडिओची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

 

भंडारा जिल्ह्यात (Bhandara News) काल (रविवारी) जिल्हा परिषद (ZP) व पंचायत समितीच्या (Panchayat Samiti) निवडणूक प्रचार करण्याचा शेवटचा दिवस होता.
त्यामुळे नाना पटोले (Nana Patole) यांनी आपल्या मतदारसंघात काँग्रेसचा पाया मजबुत राखण्यासाठी त्या ठिकाणी सभा घेतल्या. दरम्यान रात्री घेण्यात आलेल्या प्रचार सभे दरम्यान बोलताना नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदींवर (PM Narendra Modi) निशाणा साधला आहे.

नाना पटोले म्हणाले, ”मी का भांडतोय, गेल्या तीस वर्षांपासून राजकारणामध्ये आहे.
लोक पाच वर्षांमध्ये पिढीचा उद्धार करून घेतात, एवढ्या शाळा, कॉलेज उभारत असतात आणि आपल्या पुढच्या पिढीचा उद्धार करून टाकतात.
मी एवढ्या राजकारणात एक शाळा सुद्धा घेतली नाही, त्यामुळे मी मोदीला मारू शकतो,
त्याला शिव्या देऊ शकतो आणि म्हणून मोदी माझ्या विरोधात प्रचाराला आला.
एक प्रामाणिक नेतृत्व इथं आहे. त्याला हे लोक चक्रव्युहात फसवतात,” असं ते लोकांशी बोलताना म्हणाले.

 

दरम्यान, या विधानानंतर राज्यात अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.
तसेच, भंडारा जिल्ह्याचे खासदार सुनील मेंढे (MP Sunil Mendhe) यांनी ‘नाना पटोले नेहमीच बेताल वक्तव्य करत आहेत’ अशी टीका देखील केलीय.
दरम्यान, भंडारा शहर पोलीस स्टेशनमध्ये (Bhandara City Police Station) जाऊन स्वत: सुनील मेंढे पटोले यांच्या विरोधात तक्रार करणार आहेत.

 

दरम्यान, नाना पटोले यांनी याबाबत खुलासा केला आहे. ते म्हणाले, मी जिथं बोलत होतो त्या गावातील गुंडाचे नाव मोदी आहे. मी जे काही बोललो ते तेथील गावगुंड मोदी बाबत होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत नाही.

 

Web Title :- Nana Patole | i can kill narendra modi and even swear nana patoles controversial statement video goes viral in social media

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे हि वाचा