Nana Patole | ‘माझ्या मतदारसंघातील मोदी नावाच्या स्थानिक गुंडाबाबत बोललो; नाना पटोले यांचे स्पष्टीकरण

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाइन – मी मोदीला मारु शकतो व शिव्याही देऊ शकतो आणि म्हणून मोदी माझ्या विरोधात प्रचाराला आला, असं विधान केल्यामुळे काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर भाजप (BJP) नेत्यांनी जोरदार हल्ला केला आहे. नाना पटोले (Nana Patole) यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral on Social Media) झाला आहे. यानंतर मी गावातील एका मोदी नावाच्या गुंडाबद्दल (Criminal) बोललो होतो, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याबद्दल बोललो नाही. असं स्पष्टीकरण नाना पटोले (Nana Patole) यांनी दिले आहे.
भंडारा जिल्ह्यात (Bhandara District) जिल्हा परिषद (Zilla Parishad) व पंचायत समितीच्या निवडणूक (Panchayat Samiti Elections) प्रचाराची काल सांगता झाली. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आपल्या मतदारसंघातील लोकांशी बोलतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्या व्हिडिओमध्ये आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल नाना पटोले यांनी आज गडचिरोलीत (Gadchiroli) बोलाताना खुलासा केला आहे.
माझ्या मतदारसंघातील मोदी नावाच्या स्थानिक गुंडाबाबत नागरिकांनी माझ्याकडे तक्रारी केल्या असता मी त्यांच्याशी बोलतानाचा व्हिडीओ खोडसाळपणे सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे.
मी पुन्हा स्पष्ट करतो मी तिथे पंतप्रधान मोदींबद्दल नाही,तर मोदी नावाच्या स्थानिक गुंडाबाबत बोलत होतो.
— Nana Patole (@NANA_PATOLE) January 17, 2022
जे काही वक्तव्य माझ्या नावाने दाखवले जात आहे, लोक माझ्या बाजूला गोळा झाले आहेत. सध्या आमच्या जिल्ह्यात निवडणुका सुरु आहेत आणि त्या प्रचारादरम्यान लोकांनी माझ्याकडे गावातील मोदी नावाच्या गुंडाबद्दल तक्रार केली होती. त्यामुळे मी त्या गावगुंडाला बोलू शकतो वेळ आली तर मारु सुद्धा शकतो, तुम्हाला काही घाबरायचं कारण नाही, असं आश्वासन दिले होते. मी त्या गावगुंडाबद्दल बोललो होतो, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोललो नाही, असा खुलासा पटोले यांनी केला आहे.
Web Title :- Nana Patole | ‘I talked about a local goon named Modi in my constituency; Nana Patole’s explanation
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update