Nana Patole | ‘नागपूरची चड्डी ज्याने घातली तो थेट…’, नाना पटोलेंच्या टीकेला भाजपचे प्रत्युत्तर म्हणाले- ‘या संघाच्या शाखेत’

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाइन – नागपूरचा गणवेश घातला की थेट जॉईंट सेक्रेटरी (Joint Secretary) होता येतं, स्पर्धा परीक्षा देण्याची गरज भासत नाही असं विधान काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी करत पुन्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) बोचरी टीका केली आहे. त्यांच्या या वक्तव्याचा रोख नेमका कोणाच्या दिशेने होता, हे समजू शकले नाही. नाना पटोले (Nana Patole) बुलढाण्यात आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात बोलत होते.

काय म्हणाले नाना पटोले?

सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court) न्यायाधीश (Judge) माध्यमांसमोर येऊन आम्हाला वाचवा असं सांगतात. आता न्यायव्यवस्थाही धोक्यात आली आहे. प्रशासकीय सेवेत जिल्हाधिकारी (Collector), पोलीस अधीक्षक (Superintendent of Police), वन अधिकारी (Forest Officer) व्हायचं असेल तर तुम्हाला युपीएससीची परीक्षा (UPSC Exam) उत्तीर्ण व्हावे लागते. आता तर युपीएससीची परीक्षा नाही, नागपूरची चड्डी ज्याने घातली तो थेट जॉईंट सेक्रेटरी पदावर जातो असं चित्र आपण पाहत आहोत, अशी टीका नाना पटोले यांनी केली.

भाजपचं पटोलेंना प्रत्युत्तर

नाना पटोले यांच्या विधानावर भाजप नेते राम कदम (BJP Leader Ram Kadam) यांनी दिले आहे.
ते म्हणाले, जेव्हापासून सरकार गेलं आहे तेव्हापासून फक्त काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नव्हे,
तर तिन्ही पक्षाच्या नेत्यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे.
आपण काय बोलत आहोत याचंही त्यांना भान राहिलेलं नाही.
वसुली कार्यक्रम, बदल्यांचे पैसे, कमिशन मिळणं बंद झालं आहे, त्यात माध्यमंही त्यांना विचारत नाहीत,
त्यामुळे माध्यमांमध्ये कशाप्रकारे यायला मिळेल यासाठी अशी विधानं करतात.

हाफ पँटचं इतकं कौतुक असेल तर एकदा संघाच्या शाखेत यावं, म्हणजे त्यांना देशप्रेम,
समर्पित भाव आणि प्रसिद्धीपासून दूर राहून कसं झिजायचं असतं हे कळेल.
आयुष्यात वसुलीच्या पुढे कार्यक्रम केला नाही,
हिंदूंचा द्वेष केला, भारताच्या आधी आपला पक्ष अशी भूमिका असणाऱ्या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांकडून फार अपेक्षा नाहीत, अशी टीका राम कदम यांनी केली

Web Title :- Nana Patole | if someone wear rss half pant he dont need to give competitive exams he will be directly posted as joint secretary

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Crime | महिलेवर लैंगिक अत्याचार करुन 66 लाखाची फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक, देहूरोड परिसरातील घटना

Police Suspended | शिक्रापूर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार निलंबित

Skin Health | त्वचेसाठी विषापेक्षा कमी नाहीत ‘हे’ 4 पदार्थ, आजच खाणे बंद करा