Nana Patole | मुख्यमंत्र्यांच्या फोननंतर देखील नाना पटोले कसबा विधानसभा पोटनिवडणुक लढविण्यावर ठाम; म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Nana Patole | संपूर्ण राज्याचे लक्ष हे सध्या पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीकडे आहे. सत्ताधारी भाजपकडून या दोन्ही विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी भाजप-शिंदे गटाने महाविकास आघाडीच्या नेत्यांना ही निवडणुक बिनविरोध यासाठी फोन देखील केले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी या मागणीचा फोन केला होता. त्यावर नाना पटोलेंनी काँग्रेस पक्ष कसबा पोटनिवडणुक लढविणार असल्याचे जाहीर केले आहे.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन करून नाना पटोले यांना कसब्यातून उमेदवार जाहीर न करण्याचे आवाहन केले. एखाद्या लोकप्रतिनिधीचा मृत्यु झाल्यास त्याच्या कुटुंबियांना उमेदवारी दिली जाते. त्यामुळे या पोटनिवडणुकीत उमेदवार दिला जात नाही. ही आपली परंपरा आहे. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाना पटोले यांना सांगितले. मात्र, कसब्यातून लढणार असल्याचे नाना पटोले यांनी जाहीर केले.

यावर बोलताना नाना पटोले (Nana Patole) म्हणाले, ‘मला मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता. त्यांनी परंपरा सांगितली. जर एखाद्या आमदाराचे निधन झाले तर आपण ती जागा आपण बिनविरोध निवडूण देतो, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कसबा मतदारसंघातून भाजपने टिळक कुटुंबाला उमेदवारी दिली नाही. त्यामुळे आम्ही कसब्याची तयारी करत आहोत. कसब्यातून काँग्रेसचा उमेदवार असणार आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून या निवडणुकीत लक्ष देत आहे. ही निवडणुक आम्हाला जिंकायची आहे.’ असे यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले.

 

तर यावर पुढे बोलताना नाना पटोले यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आल्यावर त्यांच्याकडे सरकारविषयी तक्रार केली. सरकार म्हणून तुम्ही बरोबर वागत नसून सत्तेत आल्यापासून तुम्ही आमची कामे थांबविली आहेत. यापूर्वी अशी कामे थांबविली गेली नव्हती, असे यावेळी नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. अशी माहिती त्यांनी दिली.

 

कसब्याच्या उमेदवारीबाबत लवकरच काँग्रेसचे नाव निश्चित होईल. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी बोलणे झाले आहे.
अजित पवार (Ajit Pawar), जयंत पाटील (Jayant Patil) यांच्याशी चर्चा करणार आहे.
असे देखील यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले.

तर, यावेळी चिंचवडच्या जागेबद्दल नाना पटोले यांना विचारले असता ते म्हणाले,
चिंचवडची जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढत आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही राष्ट्रवादी सोबत आहोत.
कसब्याबाबत प्रस्ताव देण्याची विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती.
पण भाजपने टिळक कुटुंबियांना उमेदवारी न दिल्याने आता तो प्रश्नचं राहिला नाही.
असे देखील ते यावेळी बोलताना म्हणाले.
त्यावरून काँग्रेस पक्ष कसबा पोटनिवडणुक लढविणार हे चित्र आता स्पष्ट झाले आहे.

 

 

Web Title :- Nana Patole | kasba bypoll election 2023 cm eknath shinde phone call
to nana patole but congress firm to fight election in pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा