Nana Patole | महापालिका निवडणुकीत ‘एक कुटुंब-एक तिकीट’ फॉर्म्युला – नाना पटोले

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Nana Patole | काँग्रेसच्या चिंतन शिबीरमध्ये (Congress Chintan Shibir) अनेक वेगवेगळे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये ‘एक कुटुंब-एक तिकीट’ हा फॉर्म्युला ठरविण्यात आला आहे. यानंतर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनीही याबाबत निर्णय घेतला आहे. ‘एक कुटुंब-एक तिकीट’ हा फॉर्म्युला महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, महापालिकांच्या निवडणुकांमध्ये (Maharashtra Local Bodies Election) लागू करण्यात येईल,’ असं नाना पटोले यांनी सांगितलं आहे.

 

माध्यमांशी बोलताना नाना पटोले (Nana Patole) म्हणाले, ”काँग्रेसकडून (Congress) देशात जनजागरण मोहीम केली जाणार आहे. त्या माध्यमातून काँग्रेसला गतवैभव मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल. आगामी निवडणुकांमध्ये युवकांना 50 टक्के जागा देण्यात येणार आहे. एका कुटुंबाला एकच तिकीट देण्यात येणार आहे. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत हा नियम लागू करणार आहोत.” असं ते म्हणाले.

 

पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले, ”स्वातंत्र्यानंतरचे 50 वर्ष काँग्रेसने देशाला महासत्ता बनविण्याचे काम केलं आहे.
पण, मोदी सरकारने (Modi Government) आठ वर्षात देशाला मागे आणले आहे.
देश श्रीलंकेच्या वाटेवर आहे. देशाच्या सीमा सुरक्षित नाही. संविधान सुरक्षित राहिले नाही.
याबाबत मागील तीन दिवसांच्या चिंतन शिबीरात चर्चा केली.” दरम्यान, ‘पटोलेंचा इतिहास सर्वांना माहिती आहे. मी सत्तेसाठी लढणारा कार्यकर्ता नाही. माझ्या पार्श्वभूमीची चर्चा करण्याची गरज नाही. सत्तेत राहून गद्दारी करण्याचं काम नाना पटोलेंनी केलं नाही. जे माझ्याबद्दल बोलतात त्यांची पार्श्वभूमी देशाला माहिती आहे,” असं प्रत्युत्तर नाना पटोलेंनी अजित (Ajit Pawar) पवारांना दिलं आहे.

 

Web Title :- Nana Patole | Maharashtra congress one family one ticket formula in maharashtra local bodies election nana patole

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा