Nana Patole | या सरकारच्या गलथानपणामुळे आणि नाकर्तेपणामुळे राज्य अधोगतीला गेले असून, जनतेत प्रचंड आक्रोश आणि संताप आहे – नाना पटोले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – टाटा एअरबस (Tata Airbus) हा प्रकल्प गुजरातला गेल्याने राज्याचे राजकारण तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एकमेकावर आरोप प्रत्यारोप करत आहेत. यात आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis Government) टीका करत मोठे आरोप केले आहेत. राज्यातील शिंदे-फडणवीस आणि केंद्रातील भाजप (BJP) सरकारच महाराष्ट्रातील प्रकल्प जाण्यास जबाबदार आहेत, असे नाना पटोले (Nana Patole) म्हणाले.

 

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने मागील चार महिन्यात शेतकरी, कष्टकरी, बरोजगार, तरुण विद्यार्थी आणि महिला आणि सर्वसामान्य नागरिकांसह कोणत्याही घटकाला दिलासा देऊ शकले नाही. या सरकारच्या गलथानपणामुळे आणि नाकर्तेपणामुळे राज्य अधोगतीला गेले असून, जनतेत प्रचंड आक्रोश आणि संताप आहे. राज्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी त्यांच्यावतीन आंधळे, मुके, बहिरे ईडी सरकार बरखास्त करावे, अशी मागणी आम्ही काँग्रेस (Congress) पक्षातर्फे करत आहोत, असे नाना पटोले (Nana Patole) म्हणाले. काँग्रेसच्या शिष्ट मंडळाने राजभवनात भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेऊन निवेदन दिले.

महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला गेल्याच्या निषेधार्थ, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला गेले आता शिंदे फडणवीस यांना देखील घेऊन जा, असे फलक राजभवनाच्या बाहेर दाखविण्यात आले. यावेळी माध्यामांसोबत बोलताना पटोले म्हणाले, राज्यातील प्रमुख प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्याला आर्थिक मदतीची गरज आहे.
त्यामुळे राज्य सरकारने (State Government) त्वरीत ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्याला दिलासा द्यावा.
एकीकडे निसर्गाचा मारा आणि दुसरीकडे सरकारचे दुर्लक्ष अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडले आहेत.
शेतकऱ्यांचा सरकारवर विश्वास राहिला नसून, नैराश्येपोटी शेतकरी आत्महत्येचे पाऊल उचलत आहेत.
राज्यातील प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने देखील राज्यातील तरुण बेकार राहीले आहेत, असे यावेळी नाना पटोले म्हणाले.

 

Web Title :- Nana Patole | maharashtra industry took gujarat take shinde fadnavis too maharashtra will be happy nana patole

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Airtel ग्राहकांसाठी गुड न्यूज! मोबाईल रिचार्ज करा आणि मिळवा 25 टक्के कॅशबॅक!

Indian Medical Association | इंडीयन मेडीकल अशोशिएशनची वार्षिक बैठकीत डॉक्टरांची मारामारी

Maharashtra Politics | शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकरांच्या सुरक्षेत वाढ केल्यानंतर शिंदे गटाच्या मंत्र्याने दिली प्रतिक्रिया, म्हणाले – ‘आम्ही सदैव…’