विधानसभा 2019 : लोकसभेत गडकरींनी पराभूत केलेल्या नाना पटोलेंचे पुन्हा भाजपला आव्हान

पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाल्यानंतर आता जवळपास सर्व पक्षांचे उमेदवार जाहीर झाले आहेत. सर्वच पक्ष आपले पत्ते ओपन करत आहेत. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्रातील विधानसभा होणार्‍या सार्वत्रिक निवडणुकीसाठी साकोली मतदारसंघातून नाना पटोले यांची निवड केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला या मतदारसंघाच्या लढतीसाठी काँग्रेसने अखेर आपला उमेदवार जाहीर केला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये प्रभावाचा सामना करावा लागल्यानंतर आता विधानसभेतही ते काँग्रेसकडून निवडणूक लढतील.

याआधी २००९ मध्ये नाना पटोले यांनी काँग्रेसकडूनच साकोली मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. २०१४ मध्ये भाजपकडून लोकसभेत भंडारा गोंदिया मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. मात्र त्यानंतर डिसेंबर २०१७ मध्ये त्यांनी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी मोदी सरकारने मान्य न केल्यामुळे व इतर मागास वर्गावर झालेल्या अन्यायामुळे खासदारकीचा आणि भाजप सदस्यत्वाचा राजीनामा देत पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्याआधी देखील ते साकोली मतदारसंघातूनच आमदार होते. यावेळी त्यांनी लढत भाजपचे परिणय फुके यांच्याशी होईल.

लोकसभेत गडकरींकडून पराभव :
भाजपमधून काँग्रेसमध्ये गेल्यांनतर नुकतीच नाना पटोले यांनी काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आव्हान दिले होते. त्यावेळी त्यांनी गडकरी यांना तब्बल ५ लाख मतांनी हरवण्याचा दावा केला होता मात्र गडकरींकडून त्यांचा पराभव झाला होता.

isit : Policenama.com