Nana Patole | ‘बेईमानी करुन दुसऱ्यांची घरं फोडणाऱ्या भाजपला..’, नाना पटोलेंचा इशारा

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – पदवीधर (Teachers) आणि शिक्षक मतदारसंघ (Graduates Constituencies) राज्यातील सर्व उमेदवारांबाबत आज चित्र स्पष्ट होईल, असे काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी सांगितले. तसेच नाशिक पदवीधर निवडणुकीमध्ये (Nashik MLC Election) जो डाव देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजपने (BJP) खेळला होता, तो आता जनतेला समजला आहे. दुसऱ्यांची घरे फोडणाऱ्या भाजपला जनता त्यांची जागा दाखवेल, असा सूचक इशारा नाना पटोले (Nana Patole) यांनी दिला.

नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसने घोषणा केलेले उमेदवार डॉ. सुधीर तांबे (Dr. Sudhir Tambe) आणि त्यांचा मुलगा सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांनी बंडखोरी केल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. अशातच शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांना शिवसेनेच्या ठाकरे गटाने (Shiv Sena Thackeray Group) पाठिंबा दिल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचा नेमका उमेदवार कोण? यावर नाना पटोले (Nana Patole) यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.

नाना पटोले म्हणाले, अद्याप कोणालाही पाठिंबा जाहीर केलेला नाही. या माध्यमांनी चालवलेल्या बातम्या आहेत.
आमचा अंतिम निर्णय होईल आणि आज पदवीधर मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) उमेदवार जाहीर करु, तसेच नागपूरवरही चर्चा होणार असल्याचे पटोले यांनी सांगितले.

राज्यातील पाचही जागा महाविकास आघाडी जिंकेल अशी स्थिती असल्याचे सांगत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.
बेईमानी करुन दुसऱ्यांची घरं फोडणाऱ्या भाजपचा खरा चेहरा पदवीधरांच्या, शिक्षकांच्या लक्षात आला आहे.
त्यामुळे या दोन्ही निवडणुकीत लोकं भाजपला त्यांची जागा दाखवतील, असा इशारा नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
पैशांच्या आणि सत्तेच्या जोरावर घरं फोडण्याचं पाप भाजपने केले.
त्याचे परिणाम भाजपला भोगावे लागतील, असा इशारा नाना पटोले यांनी भाजपला दिला.

Web Title :-  Nana Patole | nana patole answer who is mva congress candidate in nashik graduate constituency election after sudhir tambe rebel

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Punit Balan Celebrity League (PBCL) | दुसरी ‘पुनित बालन सेलिब्रीटी लीग’ क्रिकेट स्पर्धा; पन्हाळा जॅग्वॉर्स संघाने विजेतेपद पटकावले

Gold Rate Today | सोन्याच्या दराचे रेकॉर्ड ब्रेक! सोन्याच्या दराचा आणखी एक नवा रेकॉर्ड, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे सोन्याचे दर