Nana Patole | ‘ज्याची बायको पळते, त्याचं नाव मोदी ठरतं’; नाना पटोलेंचं पुन्हा खळबळजनक वक्तव्य, भाजपचा आक्रमक पवित्रा

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – Nana Patole | मागील काही दिवसांपुर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मोदीबद्दल (Modi) खळबळजनक विधान केल्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेलं पाहायला मिळाले. ‘मी मोदीला मारू शकतो आणि शिव्याही देऊ शकतो’ असं वक्तव्य केल्यामुळे भाजप (BJP) चांगलाच आक्रमक झाला. पटोले विरोधात राज्यात आंदोलने उभारण्यात आली. यानंतर आणखी एका वादाला नवं तोंड फुटलं आहे. “ज्याची बायको पळते, त्याचं नाव मोदी ठरतं”, असं वक्तव्य पटोले यांनी केलं आहे. त्यामुळे नाना पटोले पुन्हा वादाच्या भोव-यात सापडले आहेत. त्याचबरोबर आता भाजप आणखी आक्रमक झाला आहे.

 

नाना पटोले यांनी नाशिक (Nashik News) मधील इगतपुरी येथे सुरू असलेल्या काँग्रेस प्रशिक्षण शिबिराच्या (Congress Training Camp) समारोपाला उपस्थित होते.
त्यावेळी त्यांनी याबाबत वक्तव्य केलं आहे. तर, पटोलेंनी मोदी नाव वापरत आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
त्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. परंतु, ते वक्तव्य पंतप्रधान मोदींबद्दल नव्हतंच असं स्पष्टीकरणही नाना पटोलेंनी (Nana Patole) आज एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं. मात्र, पटोलेंविरोधात भाजप राज्यभर जोरदार आक्रमक झाल्याचे पाहायला मिळते. पटोलेंनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मुंबई (Mumbai), पुण्यात (Pune) भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले ?
”नाना पटोले यांना काँग्रेसने (Congress) अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं.
शारीरिक आणि मानसिक तपासणी करावी. ज्याची पत्नी पळून जाते त्याला मोदी म्हणतात, असं म्हणणार्‍या नाना पटोलेंना नक्की काय म्हणायचंय.
सर्वोच्च नेत्यावर टीका करुन प्रसिद्धी मिळवावी हा नाना पटोलेंचा प्रयत्न आहे.
नाना पटोले राजकारणाची पातळी किती खाली नेत आहेत, याचा कॉंग्रेसनं विचार करावा,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

 

Web Title :-Nana Patole | nana patole controvercy modi is name of the person whose wife runs away after nana patole statement controversy again in maharashtra

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा