Nana Patole | ‘बंकरखालील मुली गायब होत आहेत, आतातरी पंतप्रधानांनी जागं व्हावं’; नाना पटोलेंचा खळबळजनक दावा!

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Nana Patole | रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा (Russia Ukraine War) पाचवा दिवस आहे. भारतातील अनेक विद्यार्थी तेथे अडकून पडले आहेत. रशियाने युक्रेनवर आपलं आक्रमण सुरू ठेवलं आहे. त्यामुळे भारतातील विद्यार्थ्यांनाही याचा मोठा धोका आहे. मात्र अशातच महाराष्ट्र काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी युक्रेनमधील स्थितीबाबत बोलताना खळबळजनक असा दावा केला आहे.

 

जे बंकरखाली आहेत त्या ठिकाणचे मुलींचे व्हिडीओ (Video) पाहिले तर त्या मुलीने सांगितलं की या ठिकाणाहून मुली गायब होत आहेत. हे सगळं बघून देशाचे पंतप्रधान (PM Narendra Modi) जागे व्हावेत. सगळ्या मुलांना देशात परत आणलं पाहिजे ही सदबुद्धी मिळो अशी आशा मी करीत असल्याचे नाना पटोले म्हणाले.

 

देशातील दुतावासातसुद्धा विद्यार्थ्यांचा फोन उचलला जात नाही. केंद्र सरकार (Central Government) म्हणतं तुम्ही गडबड करू नका आम्ही सगळं पाहून घेऊ. ज्यांची मुलं आज युक्रेनमध्ये आहेत त्यांना काय वेदना होत असतील. मात्र ज्यांना मुल-बाळ नाही अशांना या वेदना काय समजणार, असं म्हणत पटोलेंनी टोला लगावला.

युद्ध होण्याआधीच युक्रेनमधील बाकी देशांच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या देशांनी स्वदेशात (Homeland) नेण्याची सोय केल्याचं तिथल्या विद्यार्थ्यांना सांगितलं.
मात्र आपल्या देशाने कोणतीही सोय केली नसल्याचा आरोप पटोलेंनी केला आहे.
त्यासोबतच भारताच्या विदेश मंत्रालयाशी (Ministry of External Affairs) मी अनेकदा बोललो असून त्याच्या कडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचं पटोलेंनी सांगितलं. नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपवर जोरदार टीका आणि आरोप केले आहेत. यावर भाजप (BJP) काय उत्तर देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

दरम्यान, युक्रेनमध्ये आज एका भारतीय विद्यार्थ्याचा मुत्यु झाला आहे.
संबंधित विद्यार्थ्याचं नाव नवीन शेखरप्पा (Naveen Shekharappa) असं होतं.
रशियन सैनिकांनी केलेल्या गोळीबारामध्ये (Firing) गोळी लागून त्याचा मृत्यु झाला.
वयाच्या 21 वर्षीच शेखरप्पा रशिया आणि युक्रेन युद्धाचा बळी ठरला आहे.

 

Web Title :- Nana Patole | nana patole criticize pm modi Russia Ukraine War indian students

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 675 नवे रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Jayant Patil | ‘युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांमध्ये सुटकेबाबत विश्‍वास निर्माण करण्यात कुठेतरी कमी पडलो’, राष्ट्रवादीची केंद्र सरकारवर नाराजी

 

Ramdas Athawale In Pune | महापालिका निवडणुकीत ‘रिपाइं’ला 25 जागा हव्यात; रामदास आठवले म्हणाले – ‘छत्रपती शिवाजी महाराज स्वयंभू राजे’