Nana Patole | ‘विधीमंडळाचाच नाही तर जनतेचा अवमान करण्याचा अधिकार कोणालाच नाही’ – नाना पटोले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी ‘विधिमंडळ हे ‘चोर’ मंडळ’ असल्याचे वक्तव्य केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. संजय राऊतांच्या विरोधात शिंदे गट (Shinde Group) – भाजपने (BJP) आक्रमक भूमिका घेत त्यांच्याविरुद्ध हक्कभंग दाखल करण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली. यावर काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी राज्याच्या जनतेचा अपमान करण्याचा हक्क कोणालाच नसल्याचे सांगितले. तसेच संजय राऊत यांनी केलेलं वक्तव्य निषेधार्ह आहे. त्याचं समर्थन करण्याचं काही कारण नसल्याचे नाना पटोले (Nana Patole) म्हणाले.

संजय राऊत यांच्या वक्तव्यावर सभागृहात गोंधळ झाल्यानंतर सभागृहाची बैठक दिवसभरासाठी स्थगित करण्यात आली आहे. यावरुन नाना पटोले (Nana Patole) यांनी माध्यमांशी बोलताना भाजपवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, सत्ताधारी पक्षाने सभागृह बंद पाडलं. व्याजदरवाढ, शेतकऱ्यांच्या शेती पंपाचं कनेक्शन कापणं, मोठ्या प्रमाणात वाढलेली महागाई यावरुन विरोधकांकडून आज हमला होणार, हे भाजपाला माहीत होतं. अशा प्रश्नांना आपल्याला उत्तरं द्यावी लागतील, त्यामुळे आजचा दिवस कसा मोडून काढता येईल, अशी रणनिती सत्ताधारी भाजपने आखली होती, असा आरोप पटोले यांनी केला.

पटोले पुढे म्हणाले, राऊतांच्या विधानाबाबत कारवाई करण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना
(Legislative Assembly Speaker) होता. भाजपच्या सदस्यांकडून हक्कभंगही आणला होता.
त्यावर तातडीने निर्णय घ्यायला हवा होता. त्याला सभागृहात कुणाचाही विरोध नव्हता.
तरी देखील त्यांनी पूर्ण दिवसाचं कामकाज तहकूब केलं.
म्हणजे एकप्रकारे राज्यातील जनतेच्या घामाच्या पैशांची उधळपट्टी सुरु आहे.
भाजपने सभागृह बंद पाडून जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं पाप केलं असल्याची टीका नाना पटोले यांनी केली.

Web Title :- Nana Patole | nana patole reaction on sanjay raut statement about not vidhimandal chormandal

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | ‘उद्धव ठाकरे देखील चोर मंडळाचे सदस्य ठरतात’, देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांवर घणाघात (व्हिडिओ)

Shiv Dhanushya Yatra | ठाकरे गटाच्या ‘शिवसंवाद’ आणि ‘शिवगर्जना यात्रे’ला शिंदे गटाकडून ‘शिवधनुष्य यात्रे’ने प्रत्युत्तर

MP Sanjay Raut | संजय राऊत हक्कभंग प्रकरणी दोन दिवसांत चौकशी, 8 मार्चला निर्णय; राहुल नार्वेकरांची माहिती