Nana Patole | भाजपने राज्यपालांकडून महाराष्ट्राची बदनामी करुन घेतली, नाना पटोलेंची टीका

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्या जागेवर नवे राज्यपाल म्हणून रमेश बैस (Governor Ramesh Bais) यांची नियुक्ती झाल्यानंतर महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) कोश्यारी यांच्या जाण्याचा जल्लोष केला जात आहे. तर भाजपवर (BJP) टीकास्त्र सोडले जात आहे. काँग्रेस (Congress) प्रदेश अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी प्रतिक्रिया देताना भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) टीका केली आहे. भाजपकडून महाराष्ट्राची बदनामी कोश्यारी यांच्यामाध्यमातून करण्यात आली. बदनामीचं काम संपल्यानंतर त्यांचा राजीनामा मंजूर (Resignation Accepted) केला. राज्यात मविआला जे यश मिळताना दिसत आहे. त्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचे नाना पटोले (Nana Patole) यांनी म्हटलं. महाराष्ट्रातील महापुरुषांना बदनाम करण्याचं काम राज्यपालांमार्फत झालं, असेही ते म्हणाले.

 

नाना पटोले (Nana Patole) पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी त्यांना राज्यापलांसदर्भात विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले, येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) मविआला महाराष्ट्रात 38 जागांवर यश मिळेल असा सर्व्हेमध्ये दिसत आहे. ही स्थिती दिसण्यामागे भगतसिंह कोश्यारी यांचा मोठा वाटा आहे. हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी कोश्यारींना पायउतार केले, अशी टीका त्यांनी केली.

जो सर्व्हे आला आहे त्यामध्ये महाविकास आघाडीला 38 खासदार (MP) निवडून येतील असं सांगितलं आहे. हे जे चित्र दिसत आहे यामध्ये सर्वात मोठा वाटा कोश्यारी यांचा आहे, हे लक्षात आल्यावर भाजप आणि मोदींनी विचार करत त्यांची पंतप्रधान पदाची खूर्ची कायम रहावी यासाठी हा निर्णय घेतला आहे. देशात भाजपची पुन्हा सत्ता यावी यासाठी केलेला हा प्रयत्न असल्याचे नाना पटोले म्हणाले.

 

नाना पटोले पुढे म्हणाले, स्वत:ला महाशक्ती समजणारं नरेंद्र मोदींचं सरकार
यांनी महापुरुषांना बदनाम करण्याचा निर्णय घेतला होता.
त्याचा विरोध महाराष्ट्राच्या जनतेने केला त्याचप्रमाणे आता भाजपला खाली उतरवायचं असेल
आणि महागाई कमी करायची असेल तर भाजपला सत्तेतून काढावं लागणार आहे,
अशी भावना जनतेच्या मनात रुजवणं गरजेचे असल्याचे पटोले म्हणाले.

 

 

Web Title :- Nana Patole | nana patole slam governor bhagatsingh koshyari and bjp for insulting maharashtra

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा