Nana Patole | पवारांच्या बैठकीनंतर नाना पटोलेंचा जागा वाटपाबाबत मोठा गौप्यस्फोट, म्हणाले- ‘जागा वाटपाबाबतचा फॉर्म्युला…’

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – कर्नाटकात काँग्रेसने (Congress) भाजपचा (BJP) पराभव केल्यानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीची बैठक (Mahavikas Aghadi Meeting) राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी झाली. या बैठकीमध्ये आगामी लोकसभा (Lok Sabha), विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) जागा वाटपावर तसेच वज्रमूठ सभेबाबत (Vajramuth Sabha) चर्चा झाल्याची माहिती समोर आली. या बैठकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे देखील उपस्थित होते. या बैठकीमध्ये महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत कुठलाही फॉर्म्युला ठरला नसून, केवळ प्राथमिक चर्चा झाल्याचं नाना पटोले (Nana Patole) यांनी सांगितलं.

 

राज्यातील महापालिकांच्या (Municipal Elections) रखडलेल्या निवडणुकांवरुन नाना पटोले (Nana Patole) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis Government) निशाणा साधला आहे. पटोले म्हणाले, आम्ही सरकारकडे अनेकवेळा महापालिका निवडणुका घेण्याची मागणी केली. परंतु सरकारला लोकांच्या भावना माहिती आहेत. या निवडणुकांमध्ये भाजपचे पानिपत होणार असल्याने ते निवडणुकांपासून पळ काढत आहेत. त्यांनी वर्षभरापासून महापालिकांच्या निवडणुका प्रलंबित ठेवल्या असून हे लोकशाहीला पोषक आहे का? असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला.

एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (NCB Officer Sameer Wankhede) प्रकरणावरुन नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना टोला लगावला.
समीर वानखेडे यांच्यावर सीबीआयकडून (CBI) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावरुन पटोले यांनी देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे.
समीर वानखेडे यांच्यावर काय कारवाई होत आहे हे माहिती नसल्याचे फडणवीस म्हणाले.
त्यांचे हे वक्तव्य बालिशपणाचे असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले.

 

 

 

Web Title :  Nana Patole | nana patoles reaction on the meeting called by sharad pawar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा