Nana Patole । शरद पवारांचा ‘हा’ पहिला प्रयत्न नाही; दिल्लीच्या बैठकीवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Nana Patole । काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (prashant kishor) यांच्यात एक बैठक झाली. त्या बैठकीवरून राजकारणात अनेक तर्कवितर्क रंगू लागल्या. त्यानंतर मात्र, उद्या (22 जून) रोजी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानी विरोधी पक्षातील 15 ते 20 महत्त्वाच्या नेत्यांची बैठक होणार आहे. या भेटीकडेही राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून आहे. मात्र, यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विरोधी पक्षांची मोट बांधण्यात येत असलेल्या या बैठकीत काँग्रेस (congress) सहभागी होण्याची शक्यता नसल्याचं पटोले (Nana Patole) यांनी म्हटलं आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

नाना पटोले (Nana Patole) यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले की, पवार (Sharad Pawar) साहेबांचा हा काही पहिला प्रयत्न नाही. ज्या-ज्या वेळी राजकीय समीकरण बदलतात, राजकारणात वेगळे वारे वाहू लागतात, तेव्हा पवारांनी अशा भूमिका घेतलेल्या आहेत. म्हणून यात नवीन काही आहे, असं म्हणणं चुकीचं असल्याचं नाना पटोले (Nana Patole) यांनी म्हटलं आहे. त्यामुळे, उद्याच्या बैठकीत काँग्रेसचे (congress) नेते सहभागी होण्याची शक्यता नसल्याचे दिसून येत आहे. तसेच, त्यामध्ये महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा देखील विषय नसल्याचा अंदाज व्यक्त होताना दिसत आहे.

दरम्यान, शरद पवार (Sharad Pawar) यांच्या दिल्लीतील निवासस्थानी उद्या होणाऱ्या बैठकीला राष्ट्रीय जनता दल (Rashtriya Janata Dal), आम आदमी पक्षासह (Aam Aadmi Party) अन्य पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. तृणमूलचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी राष्ट्रमंच नावानं एक व्यासपीठ सुरू केलं आहे. याच राष्ट्रमंचाच्या बॅनरखाली उद्या शरद पवार (Sharad Pawar) आणि विरोधकांची बैठक होत आहे. या नेत्यांच्या बैठकीमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा होईल. या बैठकीला काँग्रेसचा प्रतिनिधी अथवा नेता उपस्थित राहणार आहे की नाही, याबाबतची अधिकृत माहिती नाही. परंतु, काँग्रेसचे (congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी या बैठकीत काँग्रेस (congress) पक्ष सहभागी होण्याची शक्यता नसल्याचं म्हटलं. दरम्यान, शरद पवारांची (Sharad Pawar) आजही भूमिका नवी नसल्याचं देखील पटोले (Nana Patole) यांनी म्हटलं आहे.

UPA की तिसरी आघाडी ?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) काँग्रेसप्रणित (congress) यूपीएचं (UPA) नेतृत्त्व करावं, अशी भूमिका शिवसेना नेते संजय राऊत यांनी अनेकदा मांडली आहे. परंतु, काँग्रेस याबाबत फारशी उत्सुक नाही. आता शरद पवारांनी (Sharad Pawar) दिल्लीत विरोधकांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू केलेत. म्हणून शरद पवार (Sharad Pawar) तिसरी आघाडी तयार करत आहेत का? अशी चर्चा दिल्लीच्या वर्तुळात सुरू झाली आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Titel : Nana Patole | not sharad pawars first attempt nana patoles clear opinion meeting delhi

हे देखील वाचा

Rain Rest | राज्यात आगामी 2 दिवसासाठी हवामान विभागाकडून कोठेही अलर्ट नाही, पावसाची विश्रांती

Pimpri Chinchwad News | भोसरी पोलिसांकडून तिघांना अटक, पिस्तूलासह 4 काडतुसे हस्तगत

Earn Money | कमाईची संधी ! 23 जूनला 290 रूपये लावून तुम्ही बनू शकता लखपती! जाणून घ्या कुठे लावायचा आहे पैसा?

Coronavirus | दिलासादायक ! राज्यातील ‘या’ 15 शहरात एकाही कोरोना रुग्णांचा मृत्यू नाही, आरोग्य विभागाची माहिती