Nana Patole On Adv Satish Uke Arrest | सतीश उकेंना ED ने अटक करताच नाना पटोलेंची सावध भूमिका; म्हणाले…

0
111
Nana Patole On Adv Satish Uke Arrest nana patole reaction after enforcement directorate ed arrested advocate satish ukey satish uke
file photo

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Nana Patole On Adv Satish Uke Arrest | सक्तवसुली संचालनालयाने (ED) वकील सतीश उके (Lawyer Satish Uke) यांना अटक (Arrested) केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. सतीश उके यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याविरोधात कोर्टात याचिका दाखल केल्यानेच त्यांच्यावर ईडीने छापा टाकला असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांकडून केला होता. फोन टॅपिंग प्रकरणात सतीश उके यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचे वकीलपत्र घेतले होते. त्यानंतर उके यांच्या घरावर ईडीची धाड पडली. यावरुन नाना पटोले यांनी भाजपवर (BJP) जोरदार निशाणा साधला होता. (Nana Patole On Adv Satish Uke Arrest)

 

दरम्यान नाना पटोले यांचा काही तासानंतरच सुर पलटल्याचा दिसत आहे. बारा तासाच्या चौकशीनंतर सतीश उके यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचे धागेदोरे नाना पटोले यांच्यापर्यंत जावू शकतात अशी चर्चा होत आहे, या दरम्यान नाना पटोले यांच्याकडूनही उके प्रकरणात सावधपणे वक्तव्य केलं जात आहे.

नाना पटोले म्हणाले की, ”राज्यात अथवा देशात भाजपच्या अत्याचारी व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवणाऱ्यांविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करणे, हे प्रचलित तंत्र झालेय सतीश उके हे रश्मी शुक्ला प्रकरणात माझे वकील होते.
या पलीकडे माझा त्यांच्यांशी कोणताही घरगुती संबंध नाही. सतीश उके यांची अटक ही कायदेशीर बाब आहे.
न्यायालयात या सगळ्या गोष्टींची चर्चा होईल.
आपण एखाद्या प्रकरणात वकील नेमतो. वकील नेमला म्हणून तो आपलाच होतो का ? त्यामुळे ज्या काही घटना त्यांच्या वैयक्तिक जीवनात केल्या असतील, जसा आर्थिक गैरव्यवहाराचा विषय, त्याच्याशी माझा संबंध नसल्याचं,” त्यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- Nana Patole On Adv Satish Uke Arrest | nana patole reaction after enforcement directorate ed arrested advocate satish ukey satish uke

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा