मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Nana Patole on Ajit Pawar | सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) निकालावर प्रतिक्रिया देताना अजित पवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष (Congress State President) नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला होता. नाना पटोले यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Former Uddhav Thackeray) यांना न विचारात घेता विधानसभा अध्यक्षपदाचा (Assembly Speaker) राजीनामा दिला. त्यानंतर राजीनामा दिल्याची माहिती दिली, असा आरोप अजित पवार यांनी नाना पटोले यांच्यावर केला आहे. अजित पवारांच्या आरोपांना पटोले यांनी एका वृत्तवाहीनीशी बोलताना प्रत्युत्तर दिले आहे. (Nana Patole on Ajit Pawar)
काय म्हणाले अजित पवार?
प्रतोद नेमण्यापासून अनेक गोष्टींना सर्वोच्च न्यायालयाने चुकीचं म्हटलं आहे. मात्र पुढे काय झालं? एकतर आमचे त्यावेळचे विधानसभा अध्यक्ष (Assembly Speaker) नाना पटोले यांनी दिला. तो राजीनामा द्यायला नको होता. राजीनामा दिल्यानंतर लगेच पुन्हा विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेऊन तो विषय संपवायला पाहिजे होता. तेही दुर्दैवाने आमच्या सगळ्यांकडून झालं नाही. पटोलेंनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नसता तर 16 आमदार निलंबित (MLA Suspended) झाले असते, असे अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. (Nana Patole on Ajit Pawar)
अजित पवार खोटारडे – नाना पटोले
अजित पवार यांनी केलेल्या आरोपांना नाना पटोले यांनी प्रत्युत्तर देताना अजित पवारांना खोटारडे म्हटले आहे. अजित पवार खोटं बालत आहेत. अशोक चव्हाण (Ashok Chavan), बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आम्ही एकत्र अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांना भेटलो. त्यांना सांगितले होतं, मला आदेश आला आहे, राजीनामा द्यावा लागेन.
उपाध्यक्षांनी अध्यक्षांचे अधिकार वापरले नाहीत
मी अध्यक्षपदावर नव्हतो, तर उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांना आमदारांवर अपात्रतेची
कारवाई करता आली असती. ती त्यांनी केली नाही. एक वर्ष आम्ही अध्यक्षांची नेमणूक केली नाही,
हे अजित पवारांनी मान्य केलं. पण, उपाध्यक्षांनी अध्यक्षांचे अधिकार वापरले नाहीत, असेही नाना पटोले म्हणाले.
Web Title :- Nana Patole on Ajit Pawar | nana patole reply ajit pawar allegation do not talk uddhav thackeray will resign assembly chairman
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update