Nana Patole On Ajit Pawar | काँग्रेसचा उप मुख्यमंत्र्यांवर मोठा आरोप, म्हणाले – ‘अजित पवार शिवसेनेच्या आमदारांना त्रास द्यायचे’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Nana Patole On Ajit Pawar | शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Shivsena leader Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांनी राष्ट्रवादी (NCP) – काँग्रेस (Congress) सोबत सरकार नको अशी भूमिका घेत महाराष्ट्र हितासाठी निर्णय घेणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे मी मुख्यमंत्री नको असेल तर राजीनामा देतो, अशी भूमिका उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी घेतली आहे. त्यातच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी गंभीर आरोप केला आहे. अजित पवार (Ajit Pawar) निधी वाटपात (Funding) दुजाभाव करत असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे. त्यामुळे आमदारांनी केलेल्या बंडखोरीला अजित पवार जबाबदार आहेत का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

नाना पटोले म्हणाले की, शिवसेना-भाजपात (BJP) लढाई झाली. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) किमान समान कार्यक्रमातून पुढे आले. सरकार जनतेसाठी काम करेल हा विचार होता. अर्थ खाते राष्ट्रवादीकडे होते. अजित पवार निधी वाटपात दुजाभाव करत असल्याचे समोर येत होते. शिवसेनेच्या आमदारांना (Shivsena MLA) अजित पवार त्रास द्यायचे या तक्रारी येत होत्या. काँग्रेस आमदारांनाही असाच त्रास होत होता. काँग्रेस मंत्र्यांच्या विभागाला निधी मिळत नव्हता. हे सरकार जनतेसाठी होते एका पक्षासाठी नव्हतं. त्याचा विरोध आम्ही करायचो आणि हा विरोध स्वाभाविक होता, असे पटोले यांनी सांगितले. (Nana Patole On Ajit Pawar)

 

…म्हणून क्रॉस व्होटिंग झाली

नाना पटोले पुढे म्हणाले, काँग्रेसचे 44 आमदार एकत्र आहे. विधान परिषदेत आपसात लढाई होती.
त्यामुळे व्होट क्रॉसिंग झाली. आम्हाला सत्तेची लालसा नाही. काँग्रेसला विरोधी बाकावर बसण्याचा कौल दिला होता.
आजही आमची विरोधात बसण्याची तयारी आहे. हिंदुत्व (Hindutva) नाही ईडीचा (ED) विषय आहे हे सर्वांना माहिती आहे.
ईडीच्या माध्यमातून भाजप हा खेळ खेळत असल्याचे जनतेला ठाऊक आहे. सत्तेसाठी भाजप कुठल्या थराला जाऊ शकते हे दिसून येत असल्याचे नाना पटोले म्हणाले.

 

Web Title :- Nana Patole On Ajit Pawar | NCP leader ajit pawar responsible for eknath shindes mutiny big allegation of congress nana patole

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा