Nana Patole on Bhaskar Jadhav | भास्कर जाधवांच्या आरोपांना नाना पटोलेंचे प्रत्युत्तर, म्हणाले- ‘गैरसमज निर्माण केला जात असेल तर…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Nana Patole on Bhaskar Jadhav | महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) सर्वकाही सुरळीत नसल्याचे भाजप (BJP) आणि शिंदे गटाचे (Shinde Group) नेते सातत्याने बोलत आहेत. दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार (Thackeray Group MLA) भास्कर जाधव यांनी केलेल्या आरोपांची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. भास्कर जाधवांच्या आरोपांना नाना पटोले (Nana Patole on Bhaskar Jadhav) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

काय म्हणाले भास्कर जाधव?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress State President Nana Patole) यांनी एका वत्तपत्राला दिलेली मुलाखत मी वाचली. मी राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांचीही मुलाखत पाहिली. या सगळ्या दृष्टीने समोर येऊन तिघांनी मिळून ठरलेलं धोरण सांगत असताना यांच्या स्वतंत्र मुलाखती मात्र वेगळं दर्शवत आहे, असं माझं निरीक्षण आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते संभ्रम निर्माण करत असल्याचा आरोप भास्कर जाधव यांनी केला आहे.

गैरसमज निर्माण केला जात असेल तर

भास्कर जाधव यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना नाना पटोले म्हणाले, आमची भूमिका स्पष्ट आहे. परंतु कुणी त्याचा चुकीचा अर्थ लावत असेल तर त्यावर इलाज नाही. अजूनपर्यंत आम्ही काहीच बोललो नाही. माध्यमांच्या चुकीच्या बातम्या, तसेच काही बातम्यांचा चुकीचा अर्थ लावून असा गैरसमज निर्माण केला जात असेल तर ते चुकीचं असल्याचे पटोले म्हणाले.

जागावाटपाचा निर्णय अद्याप झाला नाही

नाना पटोले पुढे म्हणाले, जागावाटपाचा निर्णय अद्याप झाला नाही. त्यासाठी एक समिती बनवण्यात येणार आहे.
दुसऱ्या बाजूला स्थानिक स्वराज्य संस्थांबद्दलची आमची भूमिका आधीपासूनच अशीच आहे. सर्वांचीच ती भूमिका आहे.
त्याने गैरसमज करुन घेण्यात काही अर्थ नाही.
महाविकास आघाडी चालेल आणि यापुढेही आम्ही मिळून काम करु असेही पटोले यांनी सांगितले.

Web Title :  Nana Patole on Bhaskar Jadhav | nana patole says dont get it wrong to bhaskar jadhav on creating confusion

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chandrakant Patil | नागरिकांच्या समस्या आठ दिवसांत सोडवून अहवाल सादर करा; चंद्रकांत पाटील यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

Maharashtra BJP | निधी वाटपावरुन भाजप आमदार नाराज, राजीनामा देण्याचा इशारा; फडणवीसांना पाठवलं पत्र

Pune BJP News | पुणे भाजपमध्ये खांदेपालट होणार, नवीन शहराध्यक्ष, 2 जिल्हाध्यक्ष शनिवारपर्यंत निश्चित