Nana Patole on Devendra Fadnavis | ‘ओबीसी आरक्षणाला देवेंद्र फडणवीसांमुळं ग्रहण लागलं’; फडणवीसांच्या टीकेला नाना पटोलेंचं प्रत्युत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Nana Patole on Devendra Fadnavis | सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Maharashtra Municipal Election 2022) घेण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाला (Maharashtra State Election Commission) आदेश दिला आहे. मात्र राज्याच्या राजकारणात ओबीसी आरक्षणावरून (OBC Reservation Maharashtra) सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी याच मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली होती. या टीकेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

 

देवेंद्र फडणवीस यांनी आमच्यावर आरोप लावला की, आमच्या जवळचे डोंगरे ही ओबीसी आरक्षणाच्या विरोधात गेले आहेत. ते खोटं बोलत आहेत. ओबीसी आरक्षणाला ग्रहण देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमुळे लागलं असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. त्यासोबतच नाना पटोले यांनी आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी कोणती हालचाल केली याबाबत माहिती दिली आहे.

 

आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी (CM Uddhav Thackeray) काल मुख्य न्यायमुर्ती यांची भेट घेतली असल्याचं नाना पटोले यांनी सांगितलं. त्यासोबतच इम्पिरिकल डेटा (Imperial Data) दिला जात नाही म्हणून अडचण झाली आहे. मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी आरक्षणाशिवाय भारत पाहिजे अशी अनेकदा घोषणा केली असल्याचं पटोले म्हणाले.

 

फडणवीस काय म्हणाले होते ?
राज्य सरकारने या आरक्षणाची ठरवून कत्तल केली आहे.
काँग्रेसकडून ओबीसींचा वापर हा दिखाऊपणापुरताच केला गेला आहे.
यामागे मोठं षडयंत्र असून 2010 साली पहिल्यांदा 50 टक्के आरक्षण देता येणार नाही असं सांगितलं होतं.
तेव्हा काँग्रेसचं सरकार होतं मात्र काँग्रेसने (Congress) काही केलं नसल्याचं फडणवीस म्हणाले.

 

Web Title :- Nana Patole on Devendra Fadnavis | congress nana patole allegation on devendra fadnavis obc reservation issue

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा