×
Homeताज्या बातम्याNana Patole On Devendra Fadanvis | 'देवेंद्र फडणवीसांना शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा...

Nana Patole On Devendra Fadanvis | ‘देवेंद्र फडणवीसांना शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार राहिला नाही…”; काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा हल्लाबोल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Nana Patole On Devendra Fadanvis| महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात वादंग निर्माण झाले आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या एका विधानावरुन राज्यात संताप व्यक्त होत आहे. शिवाजी महाराज हे जुने आदर्श आहेत, सर्वांनी आता नवीन आदर्श घेतले पाहिजेत, असे राज्यपाल म्हणाले होते. त्यातच भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनीही वादग्रस्त विधान केले. आता दोघांवर देखील महाराष्ट्रात सर्वच स्तरातून टीका होत आहे. आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर शाब्दिक हल्ला केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार राहिलेला नाही, असे नाना पटोले
(Nana Patole) म्हणाले आहेत. ते म्हणाले, ‘महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी वारंवार
महाराष्ट्रातील महापुरुषांचा आणि समाजसुधारकांचा अपमान करत असतात. हा भाजपचा अजेंडाच आहे.
भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, तर त्यांचा निषेध करण्याऐवजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांची पाठराखण करत आहेत. ही अत्यंत दुर्देवी घटना आहे.
त्यामुळे फडणवीसांना आता शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार राहिला नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वारंवार वादग्रस्त वक्तव्ये करून आणि खोटी माहिती पसरवून महाराजांचा
अपमान करून भाजप नेते आणि विविध पदांवर त्यांनी बसवलेले संघाचे बाहुले आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचे
प्रदर्शन करत आहेत.’ महाराष्ट्रातील जनता यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही,
अशा शब्दांत नाना पटोले (Nana Patole) यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे.

भगतसिंह कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या
विधानानंतर संपुर्ण राज्यातून त्यांच्यावर टीका होत आहे. शिंदे गटातील आमदारांनीही याविरोधात तीव्र
प्रतिक्रिया दिल्या आहेत. याशिवाय संभाजीराजे छत्रपती, उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले
यांनीही तीव्र शब्दांत टीका केली आहे.

Web Title :- Nana Patole On Devendra Fadnavis | nana patole criticizes devendra fadnavis over to support bhagat singh koshyari and sudhanshu trivedi comment on chhatrapati shivaji maharaj

Must Read
Related News