Nana Patole On Gujarat Election Results | ‘भय, भ्रष्टाचार, भूक अशा गोष्टींचा वापर गुजरात निवडणुकीत झाला’; गुजरात निवडणूक निकालावर नाना पटोलेंची प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Nana Patole On Gujarat Election Results | आज (८ डिसेंबर) रोजी गुजरात निवडणुकांचा निकाल (Gujarat Election Results) जाहीर केला जात आहे. निकालाचा कल पाहता गुजरात पुन्हा भाजपकडे जाणार हे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर राजकीय स्थरातून यावर प्रतिक्रिया येणे सुरू झाले आहे. गुजरातची मुख्य लढाई भाजप विरुद्ध काँग्रेस अशी होती, पण २७ वर्षे सत्तेवर असलेल्या भाजपला सत्तेवरून काढण्यात काँग्रेस अपयशी ठरली आहे. या निमित्ताने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress Leader Nana Patole) यांनी गुजरात निकालावर प्रतिक्रिया व्यक्त केली. भय, भ्रष्टाचार, भूक अशा सर्व गोष्टींचा वापर गुजरात निवडणुकीत झाला, असा आरोप नाना पटोले यांनी केला. ते एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलत होते.

“गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्जची आयात झाली. मुंद्रा पोर्टावर मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. तरुणांमध्ये व्यसनाधिनतेचं प्रमाण, भय, भ्रष्टाचार या सर्व गोष्टींचा गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर वापर झाला. जो निकाल आला त्याचं आम्ही स्वागत करतो. मात्र, लोकशाहीमध्ये मतदानाच्या वेळी नागरिकांमध्ये भय, भ्रष्टाचार आणि व्यसनाधिनता असणे, हे अपेक्षित नाही. आम्हाला गुजरातमध्ये कमी जागा मिळाल्या आहेत, आम्ही याबद्दल आत्मपरीक्षण करू. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस गुजरातमध्ये चांगली कामगिरी करेल, असा मला विश्वास आहे,” असे मत नाना पटोले यांनी व्यक्त केले. (Nana Patole On Gujarat Election Results)

निकालाबद्दल व्यसनाधिनतेचा उल्लेख केल्यामुळे, गुजरातमध्ये भाजपाचा विजय व्यसनाधिनतेमुळे झाला का?
असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर पटोले म्हणाले, “गुजरातमध्ये भाजपाचा विजय व्यसनाधिनतेमुळे झाला,
असं म्हणलो नाही. भाजपकडून या निवडणुकीत भय, भ्रष्टाचार, भूक ही प्रक्रिया वापरण्यात आली.
सुरतमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर दबावतंत्राचा वापर करण्यात आला. आयकर आणि ईडीने छापे टाकले.
हे का विसरले जात आहेत. जाणीवपूर्वक भय निर्माण करण्याचा प्रयत्न पहिल्या टप्प्यानंतर झाला.”

“पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शहा (Amit Shah)
दुसऱ्या टप्प्यात कामाला लागले आणि त्यांनी एक भयाचं वातावरण निर्माण केलं. माझा त्यावर आक्षेप आहे.
माझा निकालावर कोणताही आक्षेप नाही, निकालाचे आम्ही स्वागतच केलं आहे.
व्यसनाधिनताच नाही, तर गुजरातमध्ये जे काही होतंय, ते लोकशाहीला योग्य नाही.
व्यसनाधिनता आहे म्हणून भाजपा जिंकली असा माझा आक्षेप नाही,” असेही पटोले यांनी स्पष्ट केले.

Web Title :- Nana Patole On Gujarat Election Results | congress leader nana patole allege drugs addiction in gujrat amid gujrat election result 2022

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jayant Patil On Shinde-Fadnavis Govt | ‘जर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्वाभिमान गहाण ठेऊन काम करणार असतील…’; जयंत पाटलांची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका

Solapur Crime | पुण्यातील भाडयाच्या घरात सुरू होती बनावट नोटांची छापाई; सोलापूर पोलिसांनी छापा टाकत जप्त केल्या नोटा