Nana Patole On Lok Sabha Elections | ”राज्यात मविआ विरूद्ध भाजपा असा सरळ सामना, आम्हाला 42 जागा मिळतील”, नाना पटोलेंचा दावा

मुंबई : Nana Patole On Lok Sabha Elections | काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, समाजवादी पक्ष, शेकाप, माकपा, वंचित बहुजन आघाडीसह एकत्रितपणे निवडणूक लढवण्याची आमची तयारी आहे. भारतीय जनता पक्ष विरुद्ध महाविकास आघाडी असा सरळ सामना असून मविआ लोकसभेच्या ४२ जागांवर विजय संपादन करेल, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला. ते मुंबईतील टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलत होते.(Nana Patole On Lok Sabha Elections)

नाना पटोले म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीसाठी प्रदेश काँग्रेसची तयारी झाली आहे. मित्रपक्षांबरोबरचे जागावाटप, संघटनेची तयारी, प्रचारातील मुद्दे यांवर राज्य निवड मंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भातील चर्चा अंतिम टप्प्यात आहे.

नाना पटोले म्हणाले, बैठकीत जवळपास अडीच तास सर्व मुद्द्यांवर चर्चा झाली. ज्या मतदारसंघात ज्या पक्षाची संघटनात्मक ताकद आहे, त्या मतदारसंघात त्या पक्षाचा उमेदवार असेल, जागा वाटप हे मेरिटनुसारच होईल, त्यात कोणतेही मतभेद नाहीत. देशातील वातावरण इंडिया आघाडीसाठी अनुकुल असून परिवर्तनाचे वारे वाहत आहेत.

शेतकरीविरोधी, तरुणांचा अपेक्षाभंग करणारे, महागाई, बेरोजगारी नियंत्रित करु न शकलेल्या भाजपाच्या नरेंद्र मोदी सरकारविरोधात जनतेत प्रचंड चीड आहे. काँग्रेस पक्षावर जनतेचा विश्वास वाढला आहे.

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबाबत नाना पटोले म्हणाले, नरेंद्र मोदींचे हुकुमशाही सरकार शेतकऱ्यांना शत्रू, आतंकवादी समजून त्यांच्यावर अंधाधुंद गोळीबार करत आहे. दिल्लीच्या खनौरी सीमेवर पोलिसांच्या गोळीबारात तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला. तीन ते चार शेतकरी गंभीर जखमी झालेत.

देशाच्या पंतप्रधानाने संसदेत शेतकऱ्यांना खलिस्तानी, नक्षलवादी, आंदोलनजीवी म्हणून अपमान केला. शेतकरी विरोधी, निर्दयी मोदी सरकारचा काँग्रेस पक्ष तीव्र धिक्कार करत आहे. भाजपा सरकारला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.

पटोले म्हणाले, निवडणुका आल्यामुळे विरोधी पक्षांच्या लोकांवर सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून धाडी टाकल्या जात आहेत.
परंतु भाजपाच्या एकाही भ्रष्ट नेत्यावर कारवाई केली जात नाही.
भ्रष्टाचारमुक्त भारत करण्याची वल्गना भारतीय जनता पक्षाने केली होती.
परंतु ज्या लोकांवर भाजपाने भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांनाच भाजपात घेऊन भ्रष्टाचारयुक्त भाजपा केला आहे.

भाजपावर टीका करताना नाना पटोले म्हणाले, अजित पवार यांच्यावर ७० हजार कोटी रुपयांच्या घोटळ्याचा आरोप केला
त्यांच्यावर छापे टाकले का? उलट त्यांना सत्तेत घेऊन उपमुख्यमंत्री केले.
आदर्श घोटाळ्याचा उल्लेख पंतप्रधान मोदींनी संसदेत केला व त्यानंतर अशोक चव्हाणांना भाजपात घेऊन राज्यसभा
खासदार केले. भाजपाने भ्रष्टाचारी लोकांनी सुरक्षाकवच दिले आहे.

भाजपावर टीका करताना पटोले पुढे म्हणाले, भाजपाच्या ३०३ खासदारांमध्ये विरोधी पक्षातातील १६५ जण आहेत तर
काँग्रेसचे ६७ जण आहेत, ज्यांच्यावर भाजपाने भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. हे भ्रष्टाचारमुक्त भारत करू शकत नाहीत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

BJP MP Raksha Khadse | नाथाभाऊंच्या भाजपा घरवापसीबाबत रक्षा खडसेंचे सूचक वक्तव्य, ”बरेच लोकांचीही इच्छा…”

पिंपरी : जुन्या भांडणाच्या कारणावरुन तरुणावर कोयत्याने वार, वाकड परिसरातील घटना; तिघांना अटक

Lok Sabha Election 2024 | पिंपरी : जास्त बुथ संख्या असलेल्या मतदान केंद्रांची पोलीस आयुक्तांकडून पाहणी

Chhagan Bhujbal Vs Manoj Jarange Patil | ”…तर मनोज जरांगेंवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा”; छगन भुजबळांची मागणी, प्रकरण काय?