Nana Patole On Mahayuti Govt | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप, सरकारनं मराठा विरुद्ध ओबीसी वाद पेटवला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Nana Patole On Mahayuti Govt | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यातील महायुती सरकारवर गंभीर अरोपे केले. यामुळे सरकार अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात सुरू असलेला ओबीसी विरूद्ध मराठा (OBC Vs Maratha) वाद हा सरकारने सुरू केल्याचे पटोले यांनी म्हटले आहे. तसेच काळाराम मंदिरात दलितविरोधी पत्रके सापडली असून हा चातुर्वर्ण्य व्यवस्था आणण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप पटोले यांनी केला.

नाना पटोले म्हणाले, या सरकारने मराठा विरुद्ध ओबीसी वाद सुरू केला असून, हे सरकार जातीयवादी आहे. हा महाराष्ट्र छत्रपतती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडरांचा आहे. काळाराम मंदिरात दलितांच्या विरोधात पत्रके आढळून आली आहेत. चातुर्वण्र्य व्यवस्था आणण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे.

नाना पटोले म्हणाले, जातीनिहाय जनगणना करायला हवी, त्यातून प्रश्न सुटतील. दरम्यान, पुणे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव का झाला? त्याचा बुथ निहाय आढावा घेणार असल्याची माहिती देखील पटोले यांनी दिली.

वाढलेल्या पाणीपट्टीबाबत नाना पटोले म्हणाले, जलसंपदा विभागाने बागायतदारांसाठी दहा टक्के, कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी सात टक्के दर वाढवले आहेत. पिण्याच्या पाण्याची पाणीपट्टी देखील वाढणार आहे. आम्ही याचा निषेध करतो. विधानसभेच्या अधिवेशनात आम्ही आवाज उठवू.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Dengue Outbreak In Pune | पुणेकरांनो काळजी घ्या! शहरात डेंग्यू बाधितांच्या आकड्यात वाढ; महापालिकेकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु

JM Road Pune Crime News | जंगली महाराज रस्त्यावरील मॅकेनिकल पार्किंगमध्ये शिरले चोर, पकडण्यासाठी पोलिसांचा थरार, पण…

Ramdas Kadam On Uddhav Thackeray | बाळासाहेबांना ब्लॅकमेल करून राणेंना पक्षातून काढले, नवरा-बायको बॅग घेऊन बाहेर पडले, रामदास कदमांचे ठाकरेंवर आरोप

Pune RTO | नोंदणी न करताच वाहनविक्री केल्याने वाहनविक्री परवाना रद्द; आरटीओ कडून विक्रेत्यांवर होणार कारवाई

PMC Property Tax | मिळकत कर विभागाच्या सर्वेक्षण मोहीमेसाठी अतिरिक्त 375 कर्मचारी उपलब्ध; 40 टक्के कर सवलत देण्यासाठी महापालिका प्रशासनाची विशेष मोहीम

Vadgaon Sheri Pune Crime News | शहरात कोयता गँगचा पुन्हा धुमाकूळ; पोलिसांच्या गाडीसह इतर वाहनांची तोडफोड (Video)