Nana Patole on NCP | ‘राष्ट्रवादी ही काँग्रेस पक्षाच्या पाठीत सुरा खुपसतेय – नाना पटोले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Nana Patole on NCP | राज्यात तिन्ही पक्ष मिळून महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) एकत्र स्थापन झालं आहे. मात्र अनेक कारणावरुन आघाडी सरकारमध्ये उघड धुसफूस होताना दिसत आहे. अशातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर (NCP) थेट आरोप केला आहे. नाना पटोले यांनी ट्विटर हँडलवर खरमरीत शब्दांत ट्वीट केली. थेट राष्ट्रवादी काँग्रेसवर पाठीत सुरा खुपसल्याचा आरोप त्यांनी केल्याने राजकारणात चर्चा रंगल्या आहेत. (Nana Patole On NCP)

 

“मैत्रीचा हात पुढे करून राष्ट्रवादी काँग्रेस ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पाठीत सुरा खुपसण्याचे काम करीत आहे. आमच्या विरोधात त्यांच्या कुरघोड्या सातत्याने सुरू आहेत. याचा जाब आम्ही त्यांना नक्कीच विचारू”, असं ट्वीट नाना पटोले यांनी केलं आहे. पटोले यांनी केलेल्या या आरोपानंतर आता काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) यांच्यात वाद वाढण्याची शक्यता आहे.

 

”स्थानिक स्वराज्य संस्था महाविकास आघाडीच्या ताब्यात असाव्यात, अशी भूमिका ठरली होती. पण भंडारा-गोंदियात (Bhandara-Gondia) राष्ट्रवादीने भाजपसोबत (BJP) हातमिळवणी करून पाठीत खंजीर खुपसला. भिवंडीतही आमचे 19 नगरसेवक राष्ट्रवादीत घेतले. मैत्री करायची तर प्रामाणिक करायची. शत्रुत्व करायचं तर ते समोरून केलं पाहिजे. सोबत राहून अशा प्रकारे वर्तन केलं जात असेल तर हे बरोबर नाही. मी हायकमांडशी चिंतन शिबिरात चर्चा करेन. महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर ज्या प्रकारे राष्ट्रवादी आमच्यासोबत वागतेय, ते बरोबर नाही,” असं नाना पटोले म्हणाले.

पुढे नाना पटोले म्हणाले, “आम्हाला एकदा त्यांनी सांगून द्यावं की त्यांना भाजपासोबत जायचंय ते एकदा पहाटे गेलेच होते भाजपासोबत.
आम्हाला त्याच्याशी घेणंदेणं नाही. पण सोबत राहून पाठीवर वार करण्याची भूमिका काँग्रेसला कधीही मान्य होऊ शकत नाही.
या सगळ्या गोष्टींचा सोक्षमोक्ष लागायला हवा ही भूमिका काँग्रेसची असल्याचं,” ते म्हणाले.

 

Web Title :- Pune Crime | murder of youth in bharti vidyapeeth police station area

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा