Nana Patole on Sambhaji Raje and Prakash Ambedkar Meeting | नाना पटोलेंचा भाजपवर घणाघात, म्हणाले – ‘प्रकाश आंबेडकर-संभाजीराजे एकत्र आले तर पेशवाईला फटका’

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – मराठा आरक्षणाच्या (maratha reservation) संदर्भात राज्य सरकारने केलेला कायदा सर्वोच्च न्यायालयाने नुकताच रद्द केला आहे. आरक्षण रद्द झाल्यानंतर खासदार संभाजीराजेंनी आक्रमक पावित्रा घेत राज्यातील विविध राजकीय नेतेमंडळींच्या भेटीगाठी घेतल्या होत्या.
यात खासदार संभाजीराजेंनी (Sambhaji raje) वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची भेट  घेतल्याने विविध राजकीय चर्चांना उधाण आले होते.

सर्वात चांगली लस कोणती Covishield, Covaxin की Sputnik-V? जाणून घ्या एम्स संचालकांनी काय म्हटले

दरम्यान, यावरून कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
संभाजीराजे वेगळा पक्ष काढणार असल्याची चर्चा आहे. पण येत्या निवडणुकीत वंचित आघाडी व संभाजीराजे एकत्र आल्यास त्याचा फटका पेशवाईला बसेल.
शिवशाहीला बसणार नाही, अशी टीका पटोले यांनी केली आहे.

Pimpri Chinchwad News | रिक्षाचालकांकडे 2 हजार रुपये खंडणी मागणार्‍या टोळीतील 5 जणांना अटक

विदर्भाच्या दौ-यावर असलेले नाना पटोले (Nana Patole) अमरातवतीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी पटोले यांनी राज्यातील कोरोना अन् राजकीय परिस्थितीवरून भाजपवर निशाणा साधला आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मराठा समाज आंदोलन करत आहे.
संभाजीराजेनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली होती.

30 जूनपूर्वी करून घ्या ‘ही’ 5 अतिशय महत्वाची कामे अन्यथा लागेल मोठा दंड, सोबतच बँक खाते आणि PAN कार्ड होईल बंद

‘जर प्रकाश आंबेडकर Prakash Ambedkar आणि संभाजीराजे एकत्र आले तर याचा फटका पेशवाईलाच बसेल’,
अशी टीका पटोले यांनी केली आहे. कोरोनानंतर उद्भवणार्‍या आजारावर केंद्र सरकारकडे इंजेक्शन उपलब्ध असूनही ते महाराष्ट्राला देत नाहीत.

चुकूनही करू नका LIC चे ‘हे’ काम, अन्यथा विमा कंपनी करू शकते कठोर कायदेशीर कारवाई; जाणून घ्या

आज राज्यात 50 हजार पोस्ट कोविडचे रुग्ण असून 4 ते 5 हजार इंजेक्शन देतात व बाहेर या इंजेक्शनचा काळाबाजार केला जात आहे. यामुळे अनेकांना आपले जीव तर काहींना आपले अवयव गमवावे लागले आहेत.
मात्र केंद्राला सामान्य माणसाची काही घेणे देणे नाही ते सामान्य माणसाच्या जीवांशी खेळ करत असल्याची घणाघाती टीकाही पटोले यांनी भाजपवर केली आहे.

अनोख्या पबची आकर्षक सजावट, छताला लटकली आहे 20 लाखाची कॅश; चोरली तरी खर्च करता येणार नाही

Web Title : Nana patole on sambhaji raje and prakash
ambedkar meeting | if prakash ambedkar sambhaji raje come
together then peshwa will be hit say congress
leader nana-patole