Nana Patole On Shinde-Fadnavis Govt | ‘सरकार पडण्याची चाहुल लागल्याच्या भीतीनेच मंत्रालयात लगबग सुरु’; नाना पटोलोंचे सूचक विधान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Nana Patole On Shinde-Fadnavis Govt | महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) काय निकाल देईल यावर भाष्य करणे योग्य नाही. मात्र मंत्रालयात लगबग सुरु झाली असल्याची माहिती मिळत आहे, त्यामुळे त्यांना काहीतरी चाहुल लागली आहे असे वाटते. सधारणत: सरकारचा कालावधी संपताना किंवा सरकार जाऊ शकते अशी वेळ येते त्यावेळी अशी लगबग सुरु असते, आम्ही न्यायालयाच्या निकालाची वाट पाहात आहोत, असा टोला काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी लगावला. विधान भवनाच्या बाहेर एका वृत्तवाहिनीशी बोलताना नाना पटोले यांनी भाजपवर (BJP) निशाणा साधला. (Nana Patole On Shinde-Fadnavis Govt)

राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी गुरुवारी (दि.16) संपली. यावेळी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड (Chief Justice D. Y. Chandrachud) यांनी सत्ताधाऱ्यांच्या वकिलांना काही प्रश्न विचारले, ताशेरे ओढले यातून निर्णय आपल्या विरोधात जातो की काय या भीतीने सरन्यायाधीशांनाच काही लोकांनी सोशल मीडियात ट्रोल करण्यास सुरुवात केली. हे लांछनास्पद आहे. ट्रोल करण्याची भाडोत्री व्यवस्था कोणाकडे आहे हे सर्वांना माहित असून सरन्यायाधीशांना ट्रोल करण्याची हिम्मत करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. म्हणूनच काँग्रेसचे खासदार राष्ट्रपती यांच्याकडे दाद मागण्यासाठी गेले आहेत, असे नाना पटोले यांनी सांगितले. (Nana Patole On Shinde-Fadnavis Govt)

भाजपवर निशाणा साधताना नाना पटोले म्हणाले, भाजप किती सत्तापिपासू आहे याचा अंतच नाही.
राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार (Maha Vikas Aghadi Government) पाडताना सुरतेपासून
गुवाहाटी पर्यंत काय-काय झाले. राज्यपालांनी पदाचा कसा दुरुपयोग केला,
या सर्व घटना आपण सर्वांनी पाहिलेल्या आहेत. सुनावणीदरम्यान न्यायाधिशांनी जे काही प्रश्न विचारले,
निरीक्षणे नोंदवली यावर त्यांना ट्रोल केले गेले, हा प्रकार गंभीर आहे.
केंद्रातील सरकारवर कोणाचाच विश्वास राहिलेला नाही. राज्यात ट्रोलिंगसाठी भाड्याचे टट्टू सत्ताधाऱ्यांनी
बसवले आहेत. ट्रोलिंगसाठी त्यांना पैसे दिले जातात. म्हणूनच आमच्या काही खासदारांनी राष्ट्रपतींकडे तक्रार
करून कारवाईची मागणी केली आहे, असे नाना पटोले यांनी सांगितले.

Web Title :-  Nana Patole On Shinde-Fadnavis Govt | ‘Started immediately in ministry for fear of government collapse’; Indicative statements of nana patole

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CCTV In Police Stations | राज्यातील 1 हजार 82 पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत – देवेंद्र फडणवीस

Maharashtra Farmer News | शेतकर्‍याची यशोगाथा ! मेहनत, जिद्द आणि शासनाची साथ; खडकाळ माळरानावर फुललेल्या फळबागेचा शेतकऱ्याला हात