Nana Patole on Shivsena | नाना पटोलेंचा शिवसेनेवर जोरदार निशाणा; म्हणाले – ‘बलिदानाची पार्श्वभूमी नसणाऱ्यांना काँग्रेस काय कळणार ?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Nana Patole on Shivsena | गेली दोन दिवसांपासून काँग्रेस (Congress) आणि शिवसेना (Shivsena) यांच्यात राजकीय शीतयुद्ध रंगलं असल्याचं दिसत आहे. पंजाब काँग्रेसचे सुनील जाखड (Sunil Jakhar) आणि गुजरामधील युवा नेते हार्दीक पटेल (Hardik Patel) यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने सामनामधून काँग्रेस नेतृत्वाच्या कारभारावर सवाल उपस्थित करत टीकास्त्र सोडलं आहे. दरम्यान या टिकेनंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी नाराजी व्यक्त करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. (Nana Patole on Shivsena)

 

“ज्यांना बलिदानाची पार्श्वभूमी नाही त्यांना काँग्रेस काय कळणार ?” असा सवाल नाना पटोले यांनी केला आहे. ”काँग्रेस एक विचार आहे. विचार कधीही संपत नाही. देशाचा स्वातंत्र्यलढा असो अथवा देशाचे महासत्ता बनवण्यासाठीचे प्रयत्न, यात काँग्रेसने नेहमीच स्वत:ला झोकून दिले आहे. आज आम्ही माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची पुण्यतिथी साजरी करत आहोत. राजीव गांधी यांनी देशासाठी बलिदान दिले आणि आजच्याच दिवशी काही लोक आमच्यावर टीका करत आहेत. केंद्रातल्या भाजप सरकार मुळे बेरोजगारीचा प्रश्न गंभीर झालाय. सरकारी मालमत्ता विकली जात आहे. या गोष्टींवर अग्रलेख लिहायची गरज असल्याचं,” नाना पटोले म्हणाले. (Nana Patole on Shivsena)

पुढे नाना पटोले म्हणाले, ”भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) आहोत. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेत आपण पाहिले असेल, काही लोक भाजपालाच मदत करण्याचा प्रयत्न करून घात करत आहेत. विकासनिधी बाबतही समानता ठेवणे गरजेचे आहे. याबाबतही काँग्रेसवर अन्याय केला जातोय. निधीच्या समतोलावर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घालायला हवे,” असं ते म्हणाले.

 

Web Title :- Nana Patole on Shivsena | congress leader nana patole slams to shiv sena on saamana editorial sanjay raut

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा