Nana Patole | ‘राहुल गांधी यांच्या यात्रेमुळे देशात परिवर्तनाची लाट’ – नाना पटोले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी वीर सावरकर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. त्यामुळे काँग्रेसची (Congress) ही यात्रा रद्द करण्याची मागणी भाजपचे (BJP) राहुल शेवाळे (Rahul Shevale) यांनी केली होती. त्यावर नाना पटोले (Nana Patole) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी यांच्या यात्रेमुळे देशात एक परिवर्तनाची लाट आली आहे. त्यामुळे भाजपच्या पायाखालील वाळू सरकली आहे. म्हणून ते या यात्रेला बदनाम करत आहेत, असे नाना पटोले (Nana Patole) म्हणाले.

बिरसा मुंडा (Birsa Munda) यांची (दि. 15 नोव्हेंबर) रोजी जयंती पार पडली. यावर बोलताना नाना पटोले (Nana Patole) म्हणाले, बिरसा मुंडा इंग्रजांना शरण गेले नाहीत. त्यांनी त्यांच्या विरोधात लढा दिला. त्याचमुळे वयाच्या 24 व्या वर्षी त्यांना फाशी दिली गेली. त्यामुळे ते खरे स्वातंत्र्य सैनिक आहेत. दुसरीकडे विनायक दामोदर सावरकर (Vinayak Damodar Savarkar)यांचा इतिहास सर्वांना माहीत आहे. अंदमानच्या तुरुंगात असताना, त्यांनी अनेकवेळा इंग्रजांना पत्र लिहून माफी मागितली होती. आणि ते तुरुंगातून बाहेर आले होते. इंग्रज दर महिन्याला त्यांना पेन्शन देत होते. त्यामुळे त्याचे उत्तर भाजप आणि इतर लोकांना द्यावे. त्याच्या विरोधात गाडून टाकू, मारुन टाकू अशी भाषा सत्ताधारी करत आहेत. हे लोकशाहीला न शोभणारे आहे. त्यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याला उत्तर द्यावे. हे खरे आहे की नाही, तेवढेच सांगावे.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहे.
त्यांच्या पायाखालील वाळू सरकली आहे. कन्याकुमारीवरुन निघालेली यात्रा आता मध्य भारतात आली आहे.
त्यांच्यासोबत मोठी जनता आहे. ही पदयात्रा केवळ राहुल गांधी आणि काँग्रेसची राहिलेली नाही.
ती आता देशाच्या जनतेची यात्रा झालेली आहे. भाजपने गेल्या आठ नऊ वर्षात देशाला बर्बाद केले.
सर्वसामान्यांना त्यांच्या अधिकारांपासून दूर केले. त्यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य लोक मोठ्या संख्येने
त्यांच्या यात्रेत सहभागी होत आहेत. त्यामुळे ही यात्रा मोठी झाली आहे. केंद्रातील लोकांनी या यात्रेची दखल
घेतली आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या लोकांना ही यात्रा बदनाम करण्याची कामे दिली आहेत.
या यात्रेतून देशात एक परिवर्तनाची लाट आली आहे. त्यामुळे भाजप या यात्रेच्या विरोधात उभी राहिली आहे.

Web Title :- Nana Patole | ‘Rahul Gandhi’s visit has brought about a wave of change in the country

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjay Raut On CM Eknath Shinde | “…ढोंगी लोक बाळासाहेबांचे वारसदार होऊ पाहत आहेत”; संजय राऊतांची एकनाथ शिंदेंवर टीका

Narayan Rane | न्यायालयाच्या आदेशानंतर नारायण राणे यांच्या ‘अधीश’ बंगल्यावर हातोडा