नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन (माधव मेकेवाड) – भोकर-उमरी रस्त्यावर मालवाहू ऑटो आणि दुचाकीच्या भीषण अपघात पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवार (२६ जून) रात्री साडेदहा च्या सुमारास घडली. राजू गणेश सुर्यवंशी (रा.कौठा, जिल्हा. नांदेड, मूळ पत्ता – लामकानी, ता. भोकर, जि. नांदेड) यांचा मृत्यू झाला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, राजू सूर्यवंशी हे नांदेड मधील पोलीस अधिक्षक कार्यालयामध्ये दंगल नियंत्रण पथक विभागात कार्यरत आहेत. दुचाकीवरून जात असताना सुर्यवंशी यांच्या दुचाकीला विरुद्ध दिशेने आलेल्या मालवाहू ऑटोची जोरदार धडक बसली. अपघातात सुर्यवंशी यांचा जागीच मृत्यू झाला. अरुंद व गड्डेमय रस्ता असल्याने हा अपघात घडला. यावेळी सुर्यवंशी यांच्यासोबत असलेले त्यांचे मित्र माधव पांडगळे (रा. तामसा ता. हदगाव जि. नांदेड) यांनाही जबर मार लागला. तसेच ऑटो मधील दोघेजण जखमी झाले. सध्या जखमींवर ग्रामीण रुग्णालय, भोकर व नांदेड मध्ये वैद्यकीय उपचार सुरु आहेत.
राजू सुर्यवंशी यांचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे भोकर शहरात व तालुक्यात शोककळा पसरली आहे.
या प्रकरणी अद्याप कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाही. पुढील तपास पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भोकर पोलीस स्टेशन जमादार कारामुंगे, कृष्णा तलवारे करीत आहेत.
पाणी पिण्याबाबत आहेत अनेक गैरसमज, जाणून घ्या सत्य
कांशीराम यांनी सुरु केलेल्या सामाजिक न्याय आंदोलनाला मायावतींनी कमजोर केले – चंद्रशेखर आझाद
दुष्काळी परिस्थतीत महावितरणकडुन विज पुरवठा खंडित करण्याची मोहिम
भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीचा भगवा रंग योग्यच : रामदास आठवले
‘जय श्रीराम’ न बोलणाऱ्या तरुणास मारहाण
बोगस कागदपत्रांच्या माध्यमातून दलित, वंचितांच्या जागा बळकावणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश