नांदेडमध्ये आढळले कोरोनाचे 10 नवे पॉझिटिव्ह, 6 महिन्याच्या बालकाचा समावेश

नांदेड, पोलीसनामा ऑनलाइन – नांदेड शहरात आज सायं. ६ वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालात १० व्यक्तींना कोरानाची बाधा झाल्याने जिल्ह्यातील ही संख्या २०३ वर पोहचली आहे. आज या दहा बाधितांपैकी ८ पुरुष असून त्यांचे वय अनुक्रमे १२, ४३, ४५, ४७, ४८, ५४, ५५ व सहा महिन्याच्या बालकाचा समावेश आहे. ५ व्यक्ती या इतवारा नांदेड या बाधित क्षेत्रातील असून १ व्यक्ती मालेगाव रोड तर २ व्यक्ती सिडको नांदेड परिसरातील आणि २ महिला वय वर्षे ५० व १० असून त्यापैकी एक चौफाळा तर एक इतवारा नांदेड येथील आहे. यातील ९ व्यक्तींची सद्यस्थितीत प्रकृती स्थिर आहे. यातील ३ रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली. या ३ व्यक्तीसह एकुण १३७ व्यक्ती हे कोरोनाच्या आजारातून बरे झाले आहेत.
डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालय येथे उपचारा दरम्यान दोन बाधित व्यक्तींचा मृत्यू झाला असून त्यात ६५ वर्षाचा एक व्यक्ती इतवारा नांदेड व ४५ वर्षाचा एक पुरुष हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील आहे. या रुग्णास उच्च रक्तदाब, श्वसनाचा त्रास आणि मधुमेह इत्यादी आजार होते. औषधोपचार सुरु असलेल्या ५५ बाधितांपैकी ३ व्यक्ती ६५ वर्षे वयाची १ स्त्री आणि दोन पुरुष अनुक्रमे ३८व ७४ वर्षे वयाचे असून त्यांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे.

आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या ११ झाली आहे. जिल्ह्यात बाधित व्यक्तींपैकी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे १४ बाधित व्यक्तींवर, एनआरआय यात्री निवास कोविड केअर सेंटर येथे ३९, माहूर ग्रामीण रुग्णालय कोविड केअर सेंटर १ बाधित व्यक्तीवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली उपचार सुरु आहेत. एक बाधित व्यक्ती औरंगाबाद येथे संदर्भीत करण्यात आला आहे. बुधवार १० जून रोजी ७९ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होतील.

जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे.
सर्वेक्षण- १ लाख ४४ हजार १३,
घेतलेले स्वॅब ४ हजार ६५८,
निगेटिव्ह स्वॅब ४ हजार ९२,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या १०,
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती २०३,
स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या १७७,
स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-८१,
मृत्यू संख्या- ११,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- १३७,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती ५५,
स्वॅब तपासणी चालू व्यक्तींची ७९ एवढी संख्या आहे.

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन नांदेडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर “आरोग्य सेतू ॲप” डाऊनलोड करुन घ्यावे जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल असे डॉ. भोसीकर यांनी स्पष्ट करुन प्रशासनास जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.