दुर्देवी ! सुट्टीनिमित्त मामाच्या गावाला गेलेल्या 2 लहानग्या मित्रांचा मृत्यू

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन – मृत्यू कधी आणि कुठे येईल याचा काही नेम नसतो,  अशीच एक घटना  नांदेडमधील मुखेड तालुक्यातील जांबगावाजवळ घडली आहे. सुट्टीसाठी मामाच्या गावाला गेलेल्या दोन मित्रांचा रस्त्याच्या कामासाठी खोदलेल्या खड्यात पडून मृत्यू झाला आहे.

पुलाच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. रस्त्याचे काम सुरू असताना  पुलाच्या कामासाठी एक मोठा खड्डा खोदून ठेवला होता. शेतात जात असताना एका मुलाचा पाय घसरून तो खड्ड्यात पडला आणि त्याला वाचवायला गेलेला दुसरा मुलगा पण त्या खड्ड्यात पडला. त्यात 12 वर्षीय माधव सगर आणि ज्ञानेश्वर पुरगुलवाड याचा खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.

सुट्टीचा आनंद घेण्यासाठी ही दोन्ही मुले मामाच्या गावी आली होती. पण त्यांच्या आनंदावर काळाने घाला घातला. खेळायला जात असतानाच वाटेत त्यांना मृत्यूने गाठले . त्यांच्या अशा अचानक जाण्याने जांबगावावर शोककळा पसरली आहे.