नांदेड : एकाच दिवशी आढळले कोरोनाचे 22 नवे पॉझिटिव्ह

नांदेड (माधव मेकेवाड): पोलीसनामा ऑनलाइन –   आज (१३ जून २०२०) नवे २२ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडले, एकाच दिवशी एवढे रुग्ण आढळण्याची पहिलीच वेळ आहे, नवीन भागात कोरोनाचा फैलाव होत आहे.कोरोना रुग्णांची संख्या गतीने वाढत असताना शनिवारी २२ नवे रुग्ण आढळल्याने एकाच दिवशी एवढे रुग्ण सापडण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.गेल्या चार दिवसात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी वेळात वाढत असल्याचे दिसत आहे.

आज सापडलेले रुग्ण या भागातील आहेत कामठा – 

१,विजय कॉलनी -१,पदमजा सिटी -१,सोमेश कॉलनी -२,यशवंतनगर -१,न्यायनगर -१,श्रीकृष्णनगर -१,विणकर कॉलनी -१,संत ज्ञानेश्वरनगर -१,झेंडा चौक -१,दिपनगर -१,एचआयजी कॉलनी- १,चिखलवाडी -२,भाग्यनगर रोड -१,सिडको -१ ,स्वामी विवेकानंदनगर -१, विश्वदिपनगर -१,महावीर चौक -१, ईतवारा-१,चैतन्यनगर -१’त्या’ सहकारी बॅँकेतील कोरोनाचे खाते वाढले आहे, त्यात अनेक महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे महावीर चौक भागात असलेल्या एका बॅँकेतील कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्या बॅँकेतील अनेक कर्मचारी

संक्रमित झाल्याची माहिती असून त्यात महिलांची संख्या जास्त असल्याचे सांगण्यात येते.

•  आत्तापर्यंत एकूण संशयित – 4900
•  एकूण क्वारंटाईन व्यक्तींची संख्या- 4515
•  क्वारंटाईन कालावधी पूर्ण – 2615
•  अजून निरीक्षणाखाली असलेले – 204
•  पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये – 110
•  घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले – 4405
•  आज घेतलेले नमुने – 140
•  एकुण नमुने तपासणी- 4949
•  एकुण पॉझिटीव्ह रुग्ण- 256
•  पैकी निगेटीव्ह – 4253
•  नमुने तपासणी अहवाल बाकी- 163
•  नाकारण्यात आलेले नमुने – 83
•  अनिर्णित अहवाल – 187
•  कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले – 168
•  जिल्ह्यात बाहेरून आलेले एकूण प्रवासी 144880 राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत.