नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – गायरान जमीन (Gairan Land) खरेदी विक्री करण्यासाठी शासनाची परवानगी लागते. सदर परवानगी आदेशाची प्रत देण्याकरता लाचेची मागणी (Demanding a Bribe) करणाऱ्या भोकर तहसील (Bhokar Tehsil) कार्यालयातील महसूल सहाय्यक (Revenue Assistant) आणि खासगी व्यक्तीवर नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Nanded Acb Trap) गुन्हा दाखल करुन ताब्यात घेतले आहे. नांदेड एसीबीच्या पथकाने (Nanded Acb Trap) 11 जानेवारी रोजी पडताळणी केली असता आरोपींनी 15 हजार लाच मागून तडजोडी अंती 12 हजार स्वीकारण्याचे मान्य केले होते.
महसूल सहाय्यक सुभाष रघुनाथ कोंडलवार Subhash Raghunath Kondalwar (वय 46 रा. वायफना ता. हदगाव जि. नांदेड), खाजगी इसम दिपक चंद्रकांत घोगरे Deepak Chandrakant Ghogre (वय 51 रा.सईद नगर, भोकर जि. नांदेड) असे गुन्हा (FIR) दाखल करुन ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत 38 वर्षाच्या व्यक्तीने नांदेड एसीबीकडे (Nanded Acb Trap) 6 जानेवारी रोजी तक्रार केली आहे.
गायरान जमीन खरेदी विक्री करण्यासाठी शासनाची परवानगी लागते. सदर परवानगी आदेशाची प्रत मिळणे करीता भोकर तहसील कार्यालय येथे तक्रारदार यांनी दिड महिन्यापूर्वी अर्ज दिला होता. या अर्जावर कार्यवाही न झाल्याने तक्रारदार यांनी परत अर्ज दिला. त्यावेळी यातील महसूल सहाय्यक सुभाष कोंडलवार व खाजगी इसम दिपक घोगरे यांनी तक्रारदार यांना गायरान पट्ट्याची परवानगी आदेश प्रतीची नक्कल देण्यासाठी 15 हजार रुपये लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी नांदेड एसीबीकडे तक्रार दिली होती.
एसीबीच्या पथकाने 11 जानेवारी रोजी पडताळणी केली असता कोंडलवार आणि घोगरे यांनी तक्रारदार यांना आदेशाची नक्कल देऊन काम केले आहे.
त्याबद्दल बक्षीस म्हणुन 15 हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती 12 हजार रुपये
मागणी केल्याचे निष्पन्न झाले. दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करुन ताब्यात घेतले आहे.
ही कारवाई नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक परिक्षेत्राचे (Nanded ACB) पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे (SP Dr. Rajkumar Shinde),
अपर पोलीस अधिक्षक धरमसिंग चव्हाण (Addl SP Dharamsingh Chavan)
यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड एसीबी पोलीस उप अधीक्षक राजेंद्र पाटील (DySP Rajendra Patil),
पोलीस निरीक्षक नानासाहेब कदम (Police Inspector Nanasaheb Kadam) पोलीस अंमलदार संतोष वच्चेवार,
गणेश तालकोकुलवार, ईश्वर जाधव, प्रकाश मामुलवार, गजानन राऊत, नीलकंठ यमुनवाड यांच्या पथकाने केली.
Web Title :- Nanded Acb Trap | FIR by ACB against revenue assistant and agent, demanding bribe for giving copy of permission order for sale of Gayran land
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Sanjay Raut | निवडणुक आयोगातील सुनावणी पुढे ढकलल्यानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
Shehnaaz Kaur Gill | अभिनेत्री शहनाज गिलच्या विंटर लूकने चाहते थक्क; शेअर केले खास लूकमधील फोटो