Nanded ACB Trap | लाच प्रकरणी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाला अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – Nanded ACB Trap | मोबाईल व आधारकार्ड परत देण्यासाठी 1 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी नांदेड अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकास अटक केली आहे (Bribe Case). त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nanded ACB Trap)

अशोक रामराव कुरूळेकर (53, विमानतळ पोलिस स्टेशन, नांदेड) असे अटक करण्यात आलेल्या सहाय्यक उपनिरीक्षकाचे नाव आहे (Nanded Crime News). याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे त्यांच्या मित्राच्या वाहनावर चालक म्हणुन 3 महिन्यांपुर्वी नांदेड येथुन भोकर येथे गेले होते. सदरील वाहनात त्यांच्या मित्रासोबत एक महिला होती. त्यातील महिला ही मिसिंग झाल्याची तक्रार विमानतळ पोलिस ठाण्यात (Vimantal Police Station Nanded) दाखल होती. त्याचा तपास सहाय्यक उपनिरीक्षक अशोक कुरूळेकर यांच्याकडे होता. त्यांनी विचारपुस करण्यासाठी तक्रारदारास बोलावले आणि त्यांचा मोबाईल आणि आधारकार्ड स्वतःजवळ ठेवुन घेतला. काही दिवसानंतर सदरील महिला मिळून आली. त्यानंतर तक्रारदार हे विमानतळ पोलिस ठाण्यातील (Nanded Police) सहाय्यक उपनिरीक्षक कुरूळेकर यांच्याकडे गेले. त्यांनी सदरील महिलेचा शोध घेण्यासाठी खुप खर्च झाला असल्याचे सांगुन तक्रारदाराकडे एक हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली. (Nanded ACB Trap)

लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार दिली. प्राप्त तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये लोकसेवक कुरूळेकर यांनी लाच मागितल्याचे सिध्द झाले. त्यानंतर अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले आणि त्यांच्याविरूध्द विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

पोलिस अधीक्षक राजकुमार शिंदे (SP Rajkumar Shinde), उप अधीक्षक राजेंद्र पाटील (DySP Rajendra Patil) यांच्या
मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जमीर नाईक (PI Jamir Naik), गजानन बोडके (PI Gajanan Bodke), नानासाहेब कदम
(PI Nanasaheb Kadam), पोलिस अंमलदार राजेश राठोड, अरशद खान, रितेश कुलथे, चालक प्रकाश मामुलवार यांच्या पथकाने
ही कारवाई केली.

Web Title :-  Nanded ACB Trap | Nanded Vimantal Police Station Assistant police sub-inspector arrested by anti-corruption in bribery case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune PMC – Mahavitaran – MahaPreit | महापालिका आणि महाप्रीतच्या व्यवहारात मोठी आर्थिक अनियमीतता ! वीज पुरवठा दरात महापालिकेची फसवणूक झाल्याचा संशय

Belly Fat | पोटाची चरबी कमी करायची असेल तर करू नका ‘ही’ गोष्ट; जाणून घ्या

Pune Crime News | 50 हजारांवर अडीच लाख परत केल्यानंतरही 55 हजारांची मागणी करुन धमकाविणार्‍या सावकारावर गुन्हा दाखल, चंदननगर पोलीस ठाण्यात FIR

Maharashtra Politics News | निवडणुकीत रोहित पवारांना पाडण्यासाठी अजित पवारांनी प्रयत्न केले, शिंदे गटाच्या नेत्या खळबळजनक गौप्यस्फोट