10 लाख रुपयाची लाच घेताना वस्तू व सेवाकर उपायुक्त अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – नांदेड जिल्हा वस्तू व सेवाकर उपायुक्त यांना तबल 10 लाख रुपयांची लाच घेताना ACB ने रंगेहाथ पकडले आहे.

बाळासाहेब तुकाराम देशमुख (वय 53) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या उपायुक्त यांचे नाव आहे. याप्रकरणी नांदेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

लोकसेवक देशमुख हे नांदेड वस्तू व सेवाकर कार्यालय नांदेड या ठिकाणी उपायुक्त म्हणून नोकरीस आहेत. दरम्यान यातील तक्रारदार साखर कारखानदार आहेत. त्यांनी कारखाना उभारणी करताना खरेदी केलेल्या मशनरी व इतर साहित्यचा भरलेला व्हॅट टॅक्स व्याजासह रिफन्ड मिळन्यासाठी वस्तू व सेवाकर कार्यालयात प्रस्ताव सादर केला होता. दरम्यान हा प्रस्ताव परभणी येथून मागवून हा प्रस्ताव पुढे सह आयुक्त यांच्या मार्फत अति. आयुक्त वस्तू व सेवाकर यांच्याकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यासाठी 10 लाख रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रादार यांनी ACB नांदेड विभागाकडे तक्रार दिली होती. याची पडताळणी करण्यात आली. त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज (सोमवारी) रात्री 10 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले.

दरम्यान ACB ने केलेल्या या कारवाईमुळे नांदेड जिल्ह्यासह साखर क्षेत्र तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/