नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – नागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन आणि NRC वरून देशभर असंतोष आहे. अनेक शहरामध्ये निदर्शने होत असताना नांदेडमध्ये मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. नांदेड पोलिसांनी मोठा शस्त्रसाठा जप्त केल्यामुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. पोलीस अधीक्षक विजय कुमार मगर यांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली असून ही शस्त्रे नेमकी कशासाठी आणली होती आणि कुणाला विक्री केली जात होती याचा तपास पोलीस करत आहेत.
अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून महत्त्वाची माहिती हाती लागेल अशी शक्यता व्यक्त केली जातेय. शहरातील नागिना घाट परिसरातील एक दुकानात बेकायदेशिररित्या तलवारी आणि अन्य शस्त्र विकल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून याबाबत खात्री केली. पोलिसांनी पाठवलेल्या ग्राहकाने एक तलवार विकत घेतली. त्यांनंतर काही क्षणात पोलिसांनी या दुकानात धाड टाकली.
पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात मोठा शस्त्रसाठा सापडला. या दुकानातून पोलिसांनी 25 तलवारी, 6 खंजर, 5 गुप्ती आणि 4 कुकरी जप्त केल्या. शस्त्र विकणारा 35 वर्षीय रणजित सिंघ सरदार याला पोलिसांनी अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी विदर्भातल्या यवतमाळमध्येही मोठा शस्त्रसाठा जप्त केला होता. यवतमाळ पोलिसांनी 6 अट्टल गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्यावेळी आरोपींकडून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे आरोपीमध्ये इंजिनिअरिंगच्या एक विद्यार्थ्याचा समावेश आहे.
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/
- दातदुखी दूर करण्यासाठी ‘या’ तेलाचा होतो फायदा ! ‘हे’ आहे ६ फायदे
- तुम्हाला ‘रेड टी’ माहित आहे का? ‘हे’ आहेत ५ आरोग्यदायी फायदे
- कपड्यांना येणारी दुर्गंधी दूर करण्यासाठी ‘या’ ७ घरगुती टिप्स !
- आठवड्यातून ५ वेळा गरम पाण्याने आंघोळ केल्यास होतो ‘हा’ फायदा
- छोट्या-छोट्या गोष्टींवर रडू येते का? ‘ही’ आहेत ९ कारणे, जाणून घ्या
- ‘योगा’मुळे कमी होते नैराश्याची तीव्रता, ‘हे’ आहेत ५ परिणाम
- भुकेमुळे राग येत असेल तर करा ‘हे’ ५ उपाय, जाणून घ्या