Nanded Crime Accident News | काळाने केला घात! मोबाईलचे सामान घ्यायला गेलेल्या चौघा मित्रांचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन – Nanded Crime Accident News | नांदेड जिल्ह्यातील निजामबाद इंदलवाई मंडल या राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. यामध्ये रस्त्यावर उभ्या असलेल्या एका कंटेनरमध्ये एक भरधाव कार घुसून भीषण अपघात झाला. या अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. गणेश निरडी, आदित्य निरडी, प्रकाश अंकलवार (सर्व राहणार कुंडलवाडी), साईराम ऊर्फ बाळू ( राहणार निजामाबादजवळ) अशी या भीषण अपघातात मृत पावलेल्या तरुणांची नावे आहेत.

काय घडले नेमके?

कुंडलवाडी येथील मृत तरुण हे मोबाईल एक्सेसिरीजचा व्यवसाय करत होते. काही सामान खरेदी करण्यासाठी ते नेहमी ये-जा करत असत.त्यांचा मोबाईल एक्सेसिरीजचा व्यवसाय असल्यामुळे ते हैदराबादला मोबाईलचे सामना आणण्यासाठी गेले होते. हैदराबादला मोठी बाजारपेठ असल्यामुळे त्यांचे या ठिकाणी नेहमी येणे- जाणे असायचे. (Nanded Crime Accident News)

घटनेच्या दिवशी म्हणजे रविवारी मध्यरात्री हैदराबादहुन परत येताना रस्त्यावर थांबलेल्या कंटेनरला मागून
त्यांच्या कारने जोरधार धडक दिली. हि धडक एवढी भीषण होती कि या अपघातात चारही जणांचा जागीच
मृत्यू झाला. या घटनेमुळे नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी या गावात शोककळा पसरली आहे.
आपल्या तरुण पोरांचा असा अपघातात मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

Web Title :- Nanded Crime Accident News | nanded nizamabad indalwai national highway car and container accident four death

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kalyan Crime News | तरुणीला वाचवायला गेलेल्या तरुणांना बॅट-दांडक्यांनी बेदम मारहाण

Old Pension Scheme In Maharashtra | कर्मचारी संपाबाबत तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक; संपावर जाण्याचा निर्णय मागे घ्यावा- मुख्यमंत्र्यांचे कर्मचारी संघटनांना आवाहन